कासोदा पोलिसांची गुटखा विक्रेत्यावर धडक करवाई, लाखोचा मुद्देमाल जप्त एकास अटक..!
कासोदा पोलिसांची गुटखा विक्रेत्यावर धडक करवाई, लाखोचा मुद्देमाल जप्त एकास अटक..!

कासोदा :एरोंडोल तालुक्यातील कासोदा येथे पोलीस स्टेशन हद्दीत व परिसरात गुरुवार दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी गुटखा विक्री होत असल्याबाबत
सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी पो.उ.नि.धर्मराज पाटील, अकील मुजावर, समाधान तोंडे, प्रशांत पगारे, कुणाल देवरे, योगेश पाटील यांना रवाना केले.
येथून जवळच असलेल्या गालापूर रोडवर पाठाचे चारी जवळ खडके फाट्यावर ५:३० वाजेच्या सुमारास गालापूर तालुका एरंडोल रोडने कासोदा गावाकडे जाणारी मारुती कंपनीची इको चार चाकी वाहन क्रमांक एम.एच. २४ वी. ३३६१ हे वाहन थांबवले असता, वाहन चालक यांना त्याचे नाव गाव विचारता त्यांनी त्याचे नाव विजय शिवाजी वारे रा. कासोदा ता. एरंडोल असे सांगितले.
सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला व सुगंधित तंबाखू मिळून आल्याने सदर मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला असून वारे यास ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत किशोर हिम्मतराव बाविस्कर अन्नसुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन जळगाव यांनी कासोदा पोलीस स्टेशन येथे येऊन सदर मालाची तपासणी केली असता गुटखा पान मसाला, स्वादिष्ट सुपारी व सुगंधित तंबाखू इत्यादी एकूण १,१०,४६० रुपये किमतीचा साठा व २,००००० लाख रुपये किमतीचे इको वाहन असा एकूण ३,१०,४६० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. त्याबाबत किशोर हिम्मतराव बाविस्कर अन्न सुरक्षा अधिकारी यांनी प्रतिबंधित मालाचा पंचनामा करून अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ व भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात येऊन विजय शिवाजी वारे यास अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार व अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक निलेश अकील मुजावर, समाधान तोंडे, प्रशांत पगारे, कुणाल देवरे, योगेश पाटील अशांनी केली असून
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शना खाली कासोदा पोलिस करीत आहेत.