चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षा मार्फत १५ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको आंदोलन..!
चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षा मार्फत १५ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको आंदोलन..!

प्रतिनिधी :- जैनुल शेख
चाळीसगाव-येथील नागद रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर शेतकरी कामगार पक्षा मार्फत १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत आंदोलन केले व तहसीलदार यांना निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे
अमेरिकेतून येणाऱ्या कापूस व सोयाबीन आयातीवरील शुल्क वाढविण्याची मागणी
अमेरिकेतून आयात होणाऱ्या कापूस व सोयाबीनवर केंद्र सरकारकडून लावण्यात आलेले सदर निवेदनाद्वारे आपणास करण्यात येते की अमेरिकेने भारताकडून होणाऱ्या कृषी व दुग्धजन्य उत्पन्नावरील आयात शुल्कट तब्बल 50% पर्यंत वाढवले त्यावर भारत सरकारने अमेरिकन वस्तूने झिरो टक्के आयात शुल्क ठेवलेले आहे या धोरणामुळे भारतीय शेतकरी व्यापारी खालील प्रमाणे तोटा सहन करावा लागत आहे शेतकऱ्यांना कापसाला भाव मिळणार नाही सोयाबीनला भाव मिळणार नाहीत दुग्धजन्य पदार्थ स्वस्तात आपल्याकडे आयात होतील त्यामुळे येथील शेतकरी देखील देशोधडीला लागेल आणि आपल्या भारताचा उद्योग व्यवसाय देखील 50% मुळे कर्जबाजारीपणाने उद्योगधंदे बंद पडतील हे तुगलकी निर्णय शासनाने ताबडतोब बंद करावे अशी मागणी शेतकरी कामगार पक्ष तर्फे तहसीलदार साहेब यांना देऊन सदरील मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्यात आलेली आहे आयात शुल्क व zero आयात शुल्क कृषी शुल्क यामुळे देशातील शेतकरी व व्यापाऱ्यांवर प्रतिकूल परिणाम होत असून हे शुल्क त्वरित रद्द करावे, अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री, महसूलमंत्री तसेच शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की –
भारतीय शेतकऱ्यांचे कापूस व सोयाबीन उत्पादन थेट धोक्यात आले आहे.शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असून त्यांच्या उपजीविकेवर संकट निर्माण झाले आहे.शेतकरी आत्महत्या वाढीस लागण्याची भीती निर्माण झाली आहे. व्यापारी वर्गावरही गंभीर परिणाम होत असून व्यापार ठप्प होत आहे.अमेरिकेतील उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने आकारण्यात आलेले शुल्क भारतातील शेतकऱ्यांच्या हानीस कारणीभूत ठरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तातडीने हे शुल्क रद्द करून भारतीय शेतकरी व व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सदरील आंदोलनात भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जैनुल शेख उत्राण, जिल्हा, चिटणीस गोकुळ पाटील त्रिदल सेना प्रमुख व माजी सैनिक आबा गरुड श्री शेख जिल्हाध्यक्ष शेतकरी कामगार,चंद्रकांत ठाकरे मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष गणेश भोई जमील शेख,भगवान रोकडे विशाल पाटील,योगेश्वर राठोड,भूषण माळी,सिताराम राठोड राठोड बळीराम राठोड मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते