भडगाव यशवंत नगरमध्ये उत्साहात पार पडला शाळा प्रवेशोत्सव; भव्य रॅलीने विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत…!
भडगाव यशवंत नगरमध्ये उत्साहात पार पडला शाळा प्रवेशोत्सव; भव्य रॅलीने विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत...!

भडगाव प्रतिनिधी :-हय्युम अली सैय्यद
भडगाव:-भडगाव शहरातील यशवंत नगर मध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी, १५ जून रोजी जिल्हा परिषद उर्दू शाळा यशवंत नगर च्या वतीने ‘शाळा प्रवेशोत्सव रॅली’ अत्यंत उत्साहात व आनंदाच्या वातावरणात काढण्यात आली.
उन्हाळ्याच्या लांब सुट्ट्यांनंतर पुन्हा एकदा सुरू झालेल्या शाळांच्या निमित्ताने संपूर्ण गावात चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.सकाळी ठीक ८:०० वाजता यशवंत नगर मध्ये मुख्य चौकातून रॅलीला सुरुवात झाली. नवीन गणवेशात आणि पाठीवर दप्तर घेतलेले लहान-लहान विद्यार्थी या रॅलीचे मुख्य आकर्षण होते.
विद्यार्थ्यांनी हातात ‘शिक्षण हा आपला अधिकार आहे’,
घरोघरी ज्ञान पोहोचवूया’, आणि ‘मुले शिकतील, देश घडेल’ अशा घोषणा लिहिलेले फलक अभिमानाने धरले होते.
रॅली दरम्यान ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी विद्यार्थ्यांवर फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर निघालेली ही रॅली गावातील प्रमुख मार्गावरून फिरून शाळेच्या प्रांगणात पोहोचली
शाळेत दाखल झाल्यावर सर्व बालकांना गुळाचा खडा आणि नवीन शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले
या आनंदाच्या आणि चैतन्यमय प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण अधिकारी राव साहेब पाटील,भडगाव व शालये वेवस्थपण समीती चे अध्यक्ष पत्रकार सय्यद हय्युम अली उपअध्यक्ष नाजीम मेहमूद शेख.केंद्र प्रमुख, शेख खलील सर, शाळेचे मुख्य अध्यपक अब्दुल जावीद सर, समाज सेवक व शिक्षक तज्ज्ञ सय्यद बशारत अली समूर्ण शिक्षक, शिक्षेका, पालक वर्ग उपस्थित होते
यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य चिंतले. शिक्षकांनी घेतलेल्या विशेष प्रयत्नांमुळे यंदाचा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणात राहील…



