कासोदा पोलिसांची धडक कारवाई: चोरीस गेलेली मोटारसायकल काही तासांत आरोपी कडुन जप्त…!
कासोदा पोलिसांची धडक कारवाई: चोरीस गेलेली मोटारसायकल काही तासांत आरोपी कडुन जप्त...!

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे पोलिसांनी चोरीस गेलेली मोटारसायकल अवघ्या काही तासांत शोधून काढत एका आरोपीला अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांकडून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे
मिळालेल्या माहितीनुसार,
दिनांक 07/06/2026 रोजी जीवन पंढरीनाथ पवार, वय 49 वर्षे, व्यवसाय शेती, रा. वनकोठे ता. एरंडोल जि. जळगाव यांनी कासोदा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की, त्यांची काळ्या रंगाची होंडा कंपनीची CB Shine मोटारसायकल क्रमांक MH-19-DG-0072, किंमत अंदाजे रु.35,000/- ही दिनांक 06/06/2026 रोजी रात्री 02.00 ते दिनांक 07/06/2026 रोजीचे सकाळी 08.00 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरासमोरील अंगणातून चोरून नेली. सदर फिर्यादीवरून कासोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. व सदर गुन्ह्याचा तपास पो.हवा. नरेंद्र महादू पाटील यांच्याकडेस देण्यात आला
सपोनि/श्रीकांत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार त्यांच्या आदेशाने दि.07/06/2026 रोजी पोलीस स्टेशनकडील विशेष पथकाने सायंकाळी 20.00 वाजेच्या सुमारास नाकाबंदी केली नाकाबंदी पथक वाहनांची तपासणी करीत असताना त्यांना एक इसम संशयास्पदरीत्या मोटारसायकल चालविताना आढळून आला. त्यास थांबवून वाहनाबाबत विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे वाहनाची पडताळणी करण्यात आली. तपासणीअंती सदर वाहन हे चोरीस गेलेली होंडा कंपनीची CB Shine मोटारसायकल क्रमांक MH-19-DG-0072 असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित इसमास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याचे नाव रोशनसिंग गोवर्धनसिंग चौहान, वय 22 वर्षे, रा. असरावता, ता. पानसेमल, जि. बडवानी (मध्यप्रदेश) असे असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीकडून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली असून वाहनाचा पंचनामा करण्यात आला आहे. सदरील वाहन चौकशी करुन मुळ मालकाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. चोरीस गेलेले वाहन अल्पावधीत हस्तगत करण्यात कासोदा पोलीस स्टेशनला यश आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. आरोपीताच्या चौकशी दरम्यान त्याच्या सोबत अजुन एक साथीदार असल्याचे कबुल केले असुन त्याचे नाव- कर्तारसिंग जुन्नी रा. धरणगाव ता. धरणगाव जि. जळगाव असे निष्पन्न झाले असुन आरोपीताचा शोध घेण्याकाठी तपासपथक रवाना झाले आहे.
सदर कामगिरी पोलीस अधिक्षक सो. जळगाव मा.श्रीकांत धिवरे मा. अशोक नखाते अपर पोलीस अधिक्षक सो, चाळीसगाव परिमंडळ व मा. विजयकुमार ठाकुरवाड उपविभागीय पोलीस अधिकारी सो, चाळीसगाव उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली
कासोदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांचे पथक पोउनि/धर्मराज पाटील, पो.हवा/नरेंद्र पाटील, पो.हवा/नंदलाल परदेशी, पोना/ अकिल मुजावर, पो.कॉ. सोनू पाचुंदे यांनी पार पाडली..



