स्वातंत्र्य दिनानिमित्त एरंडोल AIMIM च्या वतीने भव्य रक्तदान शिबीर, 30 जणांनी केले रक्तदान…!
स्वातंत्र्य दिनानिमित्त एरंडोल AIMIM च्या वतीने भव्य रक्तदान शिबीर, 30 जणांनी केले रक्तदान...!

इमरान शेख उपसंपाक
एरंडोल शहरातील दि.15 ऑगस्ट रोजी देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन सामाजिक उपक्रमाने साजरा करत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM एरंडोल च्या वतीने चांद शाह वली चौक, एरंडोल येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
शिबीर सकाळी 9:00 ते दुपारी 5:00 या वेळेत पार पडले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 30 जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी दाखवली.
मान्यवरांची उपस्थिती
या शिबिराला एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सुनील पवार यांनी भेट देऊन आयोजकांचे व रक्तदात्यांचे कौतुक केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
एरंडोल AIMIM च्या वतीने शेख मोहसीन रझा आवेश पठाण यांच्यासह शाकिर सर, असलम दादा , आरिफ दादा , अल्ताफ दादा , हसनैन, मोहसीन खान व इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
रक्तदात्यांसाठी भेटवस्तू..
रक्तदान करणाऱ्या प्रत्येकास प्रोत्साहन म्हणून आयोजकांच्या वतीने आकर्षक गिफ्ट देण्यात आले.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. स्वातंत्र्य दिनी हा उपक्रम राबवून रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णांना मदत करण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. संपूर्ण शिबीर शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडले.



