Breaking
जळगाव

प्रवक्ता अकॅडमीची विद्यार्थिनीची राज्यस्तरीय पब्लिक स्पिकिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत पटकावला द्वितीय क्रमांक…

1 1 3 8 0 4

एरंडोल प्रतिनिधी : 2 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील नवसारी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पब्लिक स्पिकिंग स्पर्धेत एरंडोल येथील प्रवक्ता अकॅडमीची विद्यार्थिनी निशिका ज्ञानेश्वर महाजन हिने उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत तब्बल 2,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एवढ्या मोठ्या संख्येतील स्पर्धकांमधून द्वितीय क्रमांक मिळवत निशिका ज्ञानेश्वर महाजन हिने आपल्या प्रभावी वक्तृत्वाची छाप पाडली. तिच्या या यशामुळे एरंडोल शहरासह प्रवक्ता अकॅडमीचे नाव अभिमानाने उंचावले आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दल निशिका हिला पारितोषिक म्हणून इलेक्ट्रिक सायकल प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमाला केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच प्रवक्ता अकॅडमीचे संस्थापक रवींद्र पाटील आणि संचालक डॉ. विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. निशिका ज्ञानेश्वर महाजन हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्रवक्ता अकॅडमीच्या शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालकांकडून तिचे अभिनंदन करण्यात आले असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 3 8 0 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे