जळगाव जिल्ह्यात SIR मोहिमेत एरंडोलचा डंका! नायब तहसीलदार अमोल बन यांची जिल्ह्यात अव्वल कामगिरी…!
जळगाव जिल्ह्यात SIR मोहिमेत एरंडोलचा डंका! नायब तहसीलदार अमोल बन यांची जिल्ह्यात अव्वल कामगिरी...!

इमरान शेख उपसंपादक सत्यकाम न्यूज डिजिटल मीडिया नेटवर्क एरंडोल
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव; महसूल सहाय्यक विजय कोळी यांच्यासह टीमचेही कौतुक
एरंडोल |जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत एरंडोल तालुक्याने अव्वल स्थान पटकावले आहे.
या मोहिमेत उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध काम केल्याबद्दल एरंडोलचे नायब तहसीलदार अमोल बन यांना जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला आहे. जिल्हाधिकारी *रोहन घुगे* यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
अमोल बन यांनी उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वेळेचे अचूक नियोजन, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि नोंदींची अचूक पडताळणी करून हे यश मिळवले आहे.
या यशात सांघिक कार्यालाही मोठा वाटा आहे. नायब तहसीलदार यांना सहकार्य करणारे महसूल सहाय्यक विजय कोळी, श्री. शेख, श्री. ठाकूर, विशाल सोनवणे आणि मीना मॅडम* यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी विजय कोळी यांचाही प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान केला.



