Breaking
ब्रेकिंग

कासोद्यात राजकीय ‘भूकंप’! राष्ट्रवादीच्या शेकडो अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; आमदार अमोलदादा पाटीलची वाढती ताकद चर्चेत…!

कासोद्यात राजकीय ‘भूकंप’! राष्ट्रवादीच्या शेकडो अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; आमदार अमोलदादा पाटीलची वाढती ताकद चर्चेत...!

1 0 4 9 7 5

उपसंपादक :-इमरान शेख

कासोदा शहरातील हजरत नामदर शाह बाबा दर्गा जवळ दि . १८ जुलै रोजी  जाहीर प्रवेश- एरंडोल पारोळा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल दादा पाटील यांच्या नेतृत्वावर आणि विकासकामांवर विश्वास ठेवून कासोदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातील शेकडो अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांनी आज शिवसेना-युवासेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे कासोद्याच्या राजकारणात मोठा ‘भूकंप’ झाल्याची चर्चा आहे.

कासोदा शहरातील नामदर शाह बाबा दर्गा जवळ शिवसेना युवासेना शाखा कासोदा आणि कासोदा मुस्लिम समाज यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत झाली. प्रवेशित कार्यकर्त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार अमोल दादा पाटील यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या.

या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. वासुदेव सुभाष पाटील, तालुकाप्रमुख श्री. रवींद्र भाऊ जाधव, युवा सेना तालुकाप्रमुख श्री. कमलेश पाटील, माजी युवासेना तालुकाप्रमुख श्री. बबलू पाटील उपस्थित होते.

याशिवाय दूध संघ संचालक श्री. दगडू धोंडू चौधरी, शहर संघटक श्री. संदीप मराठे, युवा सेना शहर प्रमुख श्री. सोनुभाऊ शेलार पैलवान, अल्पसंख्याक आघाडी तालुकाप्रमुख अॅड. अहमद जे सैय्यद, युवा सेना जिल्हाप्रमुख श्री. भाऊसो मनोज भाऊ पाटील पैलवान, विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री. तात्यासो सुदाम राक्षे, माजी जि.प. उपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर धोंडू आमले, शिवसेना शहरप्रमुख व माजी सरपंच श्री. महेश बापू पांडे, सरपंच श्री. पुरुषोत्तम भास्कर चौधरी, उपशहर प्रमुख श्री. अमोल सुरेश पवार, गटप्रमुख श्री. भूषण भाऊ शेलार पैलवान, अल्पसंख्याक आघाडी उप जिल्हाप्रमुख श्री. जावेद मुजावर, नगरसेवक श्री. रुपेश माळी, श्री. अनिल महाजन आणि श्री. अमोल तबली यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील म्हणाले, “आमदार अमोल दादा पाटील यांनी तालुक्याच्या विकासासाठी केलेले काम सर्वांसमोर आहे. त्यामुळेच आज मोठ्या संख्येने लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत.”  तालुकाप्रमुख रवींद्र जाधव यांनी नवीन प्रवेशित कार्यकर्त्यांना पक्षाची ध्येय-धोरणे समजावून सांगितली.

आयोजक हा संपूर्ण सोहळा,जुल्फीकार अली सय्यद, इमरान मुजावर, तावकल शेख, बिलाल काझी,मुक्तार सर.अजमल पठाण, जुबेद अली, अल्ताफ अली, शरीफ पठाण, आरिफ अली, बशीर शेख आणि 15 बॉयज यांच्या पुढाकाराने शिवसेना युवासेना शाखा कासोदा आणि कासोदा मुस्लिम समाज यांच्यावतीने पार पडला.

या भव्य प्रवेशामुळे एरंडोल तालुक्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 4 9 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे