Breaking
ब्रेकिंग

कोठली येथे कुणाल विलास भिल बकरीसाठी चारा तोडताना विजेचा धक्का ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू…!

कोठली येथे कुणाल विलास भिल बकरीसाठी चारा तोडताना विजेचा धक्का ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू...!

1 0 0 7 6 9

भडगाव प्रतिनिधी :–हय्युम अली सैय्यद

भडगाव :-भडगाव तालुक्यातील शनिवारी दि. ७ जून रोजी दुपारी सुमारे ४.४० वाजता कोठली येथे बकरींसाठी चारा तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या ९ वर्षीय चिमुकल्याचा विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. आजीच्या डोळ्यादेखत नातवाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत मुलाचे नाव कुणाल विलास भिल ९,वर्ष आहे.  कुणाल हा आपल्या आजी हिराबाई भिल यांच्यासोबत शिवारात बकरींसाठी चारा आणण्यासाठी गेला होता. सुबाभूळच्या झाडावर चढून चारा तोडत असताना झाडालगत गेलेल्या वीजवाहिन्यांचा त्याला स्पर्श झाला.

यात कुणाल विलास भिल  त्याचा जागीच मृत्यू झाला. घटना घडताच हिराबाई यांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून शेतकरी व ग्रामस्थ घटनास्थळी धावले. घेतले मात्र, तोपर्यंत चिमुकल्याचा मृत्यू झाला होता.

भडगाव ग्रामीण रुग्णालयात मृत घोषित केले..

ग्रामस्थांच्या मदतीने कुनालला भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात कुनालवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीवेळी कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

एकुलत्या मुलाच्या निधनाने कुटुंब उदध्वस्त..

कुणाल हा कुटुंबातील एकटा मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे. तो कोठली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होता. नव्या शैक्षणिक वर्षात तो तिसरीत जाणार होता. या प्रकरणी भडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 0 7 6 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे