Breaking
ब्रेकिंग

कासोदा पोलिसांची आणि कृषी विभाग संयुक्त  धडक कारवाईत ४.७५ लाखांचे प्रतिबंधित ‘एचटीबीटी’ कापूस बियाणे जप्त…!

कासोदा पोलिसांची आणि कृषी विभाग संयुक्त  धडक कारवाईत ४.७५ लाखांचे प्रतिबंधित 'एचटीबीटी' कापूस बियाणे जप्त...!

0 9 8 4 8 4

कासोदा :-. एरंडोल तालुक्यातील खरिपाचा हंगाम तोंडावर असताना, कृषी विभागाने कासोदा परिसरात सापळा रचून केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेल्या एचटीबीटी  कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत ४ लाख ७५ हजार रुपये किमतीचे बियाणे आणि वाहतुकीचे वाहन असा १० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.कारवाईचे तपशील गोपनीय माहितीच्या आधारे

१)घटनेचा तपशील:

आज दिनांक 0७ एप्रिल २०२६ रोजी कासोदा पोलीस स्टेशनचे परिसरात  मौजे कासोदा ता. एरंडोल येथे योगेश बळवंत पाटील ही व्यक्ती छुप्या पद्धतिने  स्वताच्या फायद्यासाठी  संशयित htbt कापुस बियाणे विक्री करित  असल्याबद्दल   माहीती  मिळाली त्यानुसार  कृषी विभागाने तपासणी केली असता सदर बियाणे HTBT प्रतिबंधित कापूस बियाणे 400 पॉकेट  (प्रती पॉकेट 450 ग्रॅम) चे आढळल्यामुळे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली

२. कारवाई पथक कृषी विभाग:

1)श्री. विकास बोरसे

(जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगाव)

1) निखिल टोळकर कृषि अधिकारी ( गुणनियंत्रण) तालुका कृषि अधिकारी एरंडोल

2)श्री. परेश बडगुजर

कृषी अधिकारी, (गुण नियंत्रण )तालुका कृषी अधिकारी धरणगाव

3)श्री. सचिन पाटील  सहा.कृषी अधिकारी पिंपळकोठा बु.

कासोदा पोलीस विभाग:-1) श्रीकांत पाटील पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कासोदा.

३)जप्त मुद्देमाल:-पथकाने केलेल्या कारवाईत खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे: अनधिकृत बियाणे: ‘प्रीमियम रिसर्च हायब्रीड कॉटन सीड  , श्री गणेशा +5ग, आकाश +5Gनावाची प्रतिबंधित कापूस बियाणे पाकिटे (एकूण 8 पोते, 400 पॅकेट).

बियाण्यांची किंमत:- 4.80 लक्ष रुपये.

एकूण जप्त मुद्देमाल:-कापूस बियाणे 475200 – (रुपये पाच लाख पस्तीस हजार दोनशे मात्र.)

मारुती सिफ्ट डीझायर गाडी अंदाजे किंमत 5,00,000/-

४)आरोपींची माहिती:

१)योगेश बळवंत पाटील मु.पो.सौंदाणे ता.जि. धुळे

2)नितीन देवरे मु. पो. वाडीभोकर ता. जि धुळे

५) कायदेशीर कारवाई:-फिर्यादी श्री. निखिल टोळकर यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन कासोदा येथे खालील कायद्यांतर्गत गुन्हा क्र.दाखल करण्यात आला आहे:

बियाणे कायदा, १९६६.व  बियाणे नियम १९६८

पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६.कापूस बियाणे अधिनियम, २००९. अत्यावश्यक वस्तू अधिनियम-१९५५.

६) मार्गदर्शक अधिकारी:-ही कारवाई कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली:

श्री. सुनील बोरकर.संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण), महाराष्ट्र राज्य.

श्री. सुभाष  काटकर.विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभाग

श्री प्रविण देशमुख- मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, महाराष्ट्र राज्य.

श्री कुरबान तडवी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव.

श्री. पद्मनाथ मस्के कृषी विकास अधिकारी, जि.प. जळगाव.

उल्हास ठाकुर  तंत्र अधिकारी (गुणनियंत्रण), नाशीक

ऍग्रोवन नुसार, कृषी विभागाने संशयास्पद चारचाकी वाहन अडवून ही मोठी कारवाई केली. हे बियाणे पर्यावरणास आणि जमिनीच्या सुपीकतेस हानिकारक असल्याने प्रतिबंधित आहेत. ऍग्रोवन च्या माहितीनुसार, याप्रकरणी कासोदा पोलीस अधिक तपास करत असून पुरवठादारांचा शोध सुरू आहे.शेतकऱ्यांनी केवळ परवानाधारक विक्रेत्यांकडूनच प्रमाणित बियाणे खरेदी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 8 4 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे