महाराष्ट्रातील नंबर दोन तर जिल्ह्यातील सर्वात मोठा अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ कासोदा येथे ३१ ऑगस्ट पासून सुरु पालखी मिरवणूक ७ सप्टेंबर रोजी
महाराष्ट्रातील नंबर दोन तर जिल्ह्यातील सर्वात मोठा अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ कासोदा येथे ३१ ऑगस्ट पासून सुरु पालखी मिरवणूक ७ सप्टेंबर रोजी

कासोदा प्रतिनिधि :- सालाबादाप्रमाणे यावर्षी ही भाद्रपद शुध्द अष्टमी ते
भाद्र पौर्णिमा या कालावधीत येथील श्री महादेव मंदीर परिसरात प.पू. संत श्री सदगुरु गोविंद महाराज यांच्या नावाने सप्ताह होणार आहे. या सप्ताहाचा आरंभ पाच जोडप्यांच्या हस्ते गुरुवर्य जोशी महाराज हे शास्त्रोक्त पद्धतीने करून घेतात.
सविस्तर वृत्त असे की…
महाराष्ट्रातील नंबर दोन तर जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेला कासोदा येथील अखंड हरिनाम सप्ताह रविवार दि. ३१ ऑगस्ट २०२५ पासून सुरु होत असून दि. ७ सप्टेंबर रविवार २०२५ रोजी सप्ताहाची सांगता होणार आहे. सकाळी ६ वाजता काकडा आरती केली जाते. याच दिवशी संध्याकाळी ६ वाजेपासून पालखी मिरवणूक निघणार आहे.
येथील अखंड हरिनाम सप्ताह सालाबादा प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहाने साजरा होणार असून सप्ताहाचे हे ७२ वे वर्ष आहे. यात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे किर्तन होणार आहे.
किर्तन महोत्सव…
१)31 ऑगस्ट 2025 रविवार श्री ह.भ.प. राजेंद्र महाराज कासोदा
२)दि. १ सप्टेंबर २०२५ सोमवार श्री ह.भ.प.ऋषिकेश महाराज बीड
३)दि.२ सप्टेंबर २०२५ मंगळवार श्री.ह.भ.प. किशोर महाराज जालना
४)दि.३ सप्टेंबर २०२५ बुधवार श्री ह.भ.प. अर्जुन महाराज परतूर जालना
५)दि.४ सप्टेंबर २०२५ गुरुवार श्री ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर
६)दि.5 सप्टेंबर 2025 शुक्रवार श्री.ह.भ.प. सोपान महाराज कान्हेकर
७)दि. ६ सप्टेंबर २०२५ शनिवार श्री ह.भ.प. शिवानंद शास्त्री महाराज पैठण
दि.७ सप्टेंबर २०२५ रविवार श्री ह.भ.प.संभाजी महाराज अहिल्यानगर यांचे सकाळी ८: ३० ते १०:३० वाजता काल्याचे किर्तन होणार आहे. तरी कासोदा आणि परिसरातील सर्व भाविक भक्तांनी वरील कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन येथील हरिनाम सप्ताह हिंदु पंच मंडळ यांनी केले आहे.