Breaking
ब्रेकिंग

कासोदा पोलिसांची मोठी कारवाई; API श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली २.९० लाखांचा मुद्देमाल जप्त…!

कासोदा पोलिसांची मोठी कारवाई; API श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली २.९० लाखांचा मुद्देमाल जप्त...!

1 1 1 9 8 8

सत्यकाम न्यूज नेटवर्क कासोदा :-इमरान शेख उपसंपादक

कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर सपोनि श्रीकांत अंकुश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करण्यात आली आहे.

दिनांक १४/०९/२०२६ रोजी सकाळी ०९:३० वाजता फरकांडे गावाजवळील सहकारी दूध डेअरीजवळ गावकऱ्यांच्या मदतीने सदर कारवाई करण्यात आली. एका मालवाहू वाहनात ३ गायींना दोरीने बांधून वेदनादायक पद्धतीने कत्तलीसाठी नेत असल्याचे निदर्शनास आले.

जप्त मुद्देमाल :-१) ३ गायी – किंमत ४०,०००/-

२) अशोक लेलँड वाहन क्र. गाडी क्रमांक MH-19-CY-3850- किंमत २,५०,०००/-

एकूण मुद्देमाल : २,९०,०००/- रुपये

अटक आरोपी :-१) चंद्रकांत बापू पवार (४०) रा. म्हसवे, ता. पारोळा – वाहन चालक व मालक

२) सुरेश भावडू सोनावणे, रा. म्हसवे – गायी विकणारा

३) राहुल गोरख वाघ, रा. खडके, ता. एरंडोल – विकत घेणारा

सदर प्रकरणी कासोदा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १४४/२०२६ अन्वये प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११(क)(घ)(ड) सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई करणारे पथक :-सपोनि श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोना नरेंद्र पाटील, पोशि योगेश पाटील, लहू हाटकर, कुणाल देवरे यांनी कारवाई केली असून पुढील तपास पोना २१७३ नरेंद्र महादू पाटील करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 1 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे