Breaking
ब्रेकिंग

कासोद्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात भूकंप माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.महानंदा ताई पाटील यांचा भाजपात जाहीर प्रवेश…!

कासोद्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात भूकंप माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.महानंदा ताई पाटील यांचा भाजपात जाहीर प्रवेश...!

1 0 5 6 6 5

कासोदा परिसरातील राजकारणात मोठा बदल झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.महानंदा ताई पाटील यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

राज्याचे मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वावर आणि विकासाच्या कामांवर विश्वास ठेवून सौ.महानंदा ताई यांनी भाजपात प्रवेश केल्याचे यावेळी सांगितले.

सौ.महानंदा ताई पाटील या कासोदा परिसरातील परिचित चेहऱ्या असून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आहेत. ठाकरे गटात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या या प्रवेशामुळे कासोदा व परिसरात भाजपची ताकद वाढली असून शिवसेना ठाकरे गटाला मोठा दणका बसला आहे.

यावेळी गिरीश भाऊ. महाजन यांनी सौ.महानंदा ताईंचे पक्षात स्वागत केले. त्यांच्या अनुभवाचा आणि जनसंपर्काचा पक्ष संघटना वाढीसाठी मोठा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एरंडोल मतदारसंघाच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 5 6 6 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे