
उपसंपादक – कल्पेश महाले
धरणगांव – तालुक्यातील तक्रारदार यांनी त्यांचे गावात गटारीचे २ लाखाचे व गावहाळ बांधण्याचे ७०,०००/- रुपयाचे अशी २,७०,०००/- रुपयाचे काम केले होते. यावेळी आरोपी 1)नितीन भीमराव ब्राम्हणे, वय ३७ वर्ष, ग्रामसेवक, खर्दे बुद्रुक, ता.धरणगाव, जि.जळगांव याने तक्रारदार यांच्याकडे वरीलप्रमाणे करण्यात आलेल्या दोन्ही कामाचे बिल काढुन देऊन सदर कामाचे १,९५,०००/- रुपये व ६९,०००/- रुपये असे २ स्वतंत्र चेक दिले होते व सदर बिलाची एकूण रक्कम २,६४,०००/- रुपये तक्रारदार यांच्या खात्यात जमा झाली होती. तक्रारदार यांच्या कामाची बिले व सदर बिलांचे २ चेक काढून दिले या कामाचा मोबदला म्हणून ग्रामसेवक नितीन ब्राह्मणे याने तक्रादार यांच्याकडे १० टक्क्याप्रमाणे २५,०००/- रुपये लाचेची मागणी केली बाबत आज रोजी २२/०३/२०२५ रोजी तक्रारदार यांनी जळगांव एसीबीकडे तक्रार दिली होती.
त्याप्रमाणे आज दि.२२/०३/२०२५ रोजी पंचासमक्ष लाचमागणी पडताळणी मध्ये ग्रामसेवक नितीन ब्राह्मणे याने तक्रारदार यांना २ कामांचे २,७०,०००/- रुपयांचे बिल काढून दिले त्या कामाचे १० टक्के प्रमाणे २७,०००/- होतात परंतु तुम्ही जवळचे असल्याने २५,०००/- द्यावे लागतील, तुम्ही सरपंच ला देखील काही देत नाही असे सांगून २५,०००/- रुपयांची स्पष्ट मागणी करुन लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली व लाच रक्कम तात्काळ आणून देण्याबाबत तक्रारदार यांना सांगितले. त्यावरुन एसीबी पथकाने रचलेल्या सापळ्यात ग्रामसेवक नितीन ब्राह्मणे याला २५,०००/- रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडन्यात आले असून त्याच्या विरुध्द धरणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून मा. न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
वरील कारवाई जळगांव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील(चालक), पो.ना.किशोर महाजन, पो.कॉ. अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.
जळगांव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व नागरिकांना केले आवाहन
जळगांव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो. जळगांव
दुरध्वनी क्रं. 0257-2235477
टोल फ्रि क्रं. 1064