बहाळ येथे वित्त आयोगातून रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन.

उपसंपादक – कल्पेश महाले
बहाळ येथे रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करताना सरपंच राजेंद्र मोरे यांच्यासोबत उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ.

काम गुणवत्तापूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी
बहाळ – ग्रामपंचायतच्या पंधरावा वित्त आयोगातून रस्ता कॉक्रिटी करण्याचे भूमिपूजन सरपंच राजेंद्र मोरे यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नेमीचंद महाजन, राकेश शिरोडे, तंटामुक्त अध्यक्ष कांतीलाल कोळी, दिलीप कोळी, भावडू महाजन, निवृत्ती महाजन, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

बहाळ ग्रामपंचायतच्या पंधरावा वित्त आयोगातून बहाळ कसबे व रथाचे येथे रस्ता काँक्रिटीकरण व बंदिस्त गटारीचे काम करण्यात येणार आहे. यासाठी 52 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून ई-टेंडर च्या माध्यमातून कंत्राटदार स्वप्निल देवरे यांनी हे काम घेतले आहे. सदर काम हे गुणवत्ता पूर्ण करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.



