0
5
3
3
8
6
प्रतिनिधी कल्पेश महाले (चाळीसगाव)
चाळीसगाव – शहरातील शासकीय विश्रामगृह जवळ आज दुपारी मुरुमाने भरलेले ट्रॅक्टर जाताना जगदीश भारकर सर यांना दिसून आले. त्यांनी तात्काळ ट्रॅक्टर थांबवून संपूर्ण चौकशी केली. ट्रॅक्टर ड्रायव्हर कडून उडवाउडवीची उत्तरे येऊ लागली. सखोल चौकशी केल्यानंतर भरलेल्या मुरमाची कोणतीही रॉयल्टी पावती आढळून आली नसता महसूल पथक अप्पर तहसीलदार जगदीश भारकर सर,शहर तलाठी गणेश गढरी, कोतवाल ऋषिकेश सूर्यवंशी यांनी कारवाई करुन चाळीसगाव तहसिल कार्यालय आवारात पोलीस कवायत मैदान येथे अवैधरित्या मुरुमाने भरलेले ट्रॅक्टर जमा केले.
सदरील कारवाईमुळे शहरातील नागरिकांकडून महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
5
3
3
8
6