जळगाव वाहतूक शाखेकडुन विशेष वाहतूक मोहिमेत २७१ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई; नियमांचे पालन करण्याचे एसपी श्रीकांत धिवरे यांचे आवाहन …!
जळगाव वाहतूक शाखेकडुन विशेष वाहतूक मोहिमेत २७१ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई; नियमांचे पालन करण्याचे एसपी श्रीकांत धिवरे यांचे आवाहन ...!

जळगाव वाहतूक शाखेकडुन विशेष वाह
जिल्हा प्रतिनिधी:-कलिम सैय्यद
जळगाव :-जळगाव जिल्ह्यात सुरक्षित शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहर वाहतूक शाखा यांनी विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकां विरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात आली. दिनांक ०३/०६/२०२६ रोजी व
शहरासह संपूर्ण जिल्ह्यात वाढत्या अपघातांना आणि बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी जळगाव वाहतूक शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या धडक कारवाईत तब्बल २७१ बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर पोलिसांकडून विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. यात प्रामुख्याने पुढील उल्लंघनांवर कडक कारवाई करण्यात आली
ट्रिपल सीट दुचाकी चालवणे.विना नंबर प्लेट आणि फॅन्सी नंबर प्लेट्सचा वापर。विनालायसन्स (विनापरवाना) वाहन चालवणे。मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे आणि विनाहेल्मेट फिरणे.
पोलीस अधीक्षकांचे स्पष्ट आवाहनही कारवाई केवळ दंडात्मक नसून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले आहे. “वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. बेशिस्त वाहन चालकांमुळे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे वाहनधारकांनी शिस्त पाळावी, सुरक्षित राहावे
आणि जळगाव पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे वाहतूक शाखेच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे नियम मोडून रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. यापुढेही ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आला आहे.
सदर कारवाईत एकूण २७१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ₹२,०३,३००/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे. हेल्मेटचा वापर न करणे, सीटबेल्ट न लावणे, सिग्नलचे उल्लंघन करणे, विनापरवाना वाहन चालविणे तसेच इतर वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून विविध विशेष उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. या मोहिमेमुळे वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचला आहे. यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हेल्मेट व सीटबेल्टचा नियमित वापर, वेगमर्यादेचे पालन आणि वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळल्यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात. सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.” तसेच यापुढे देखिल वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार असून विशेष तपासणी मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार आहेत.
सदरची वाहतुक विशेष मोहिम मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे, श्री. संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक, श्री. नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड यांच्या नेतृत्वातील वाहतुक शाखेच्या ०१ अधिकारी व २३ अंमलदार यांनी उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


