धीर सोडु नका, सर्वोतोपरी मदत, सहकार्यासाठी माझ्यासह प्रशासन सज्ज – आमदार मा.अमोलदादा पाटील.
धीर सोडु नका, सर्वोतोपरी मदत, सहकार्यासाठी माझ्यासह प्रशासन सज्ज - आमदार मा.अमोलदादा पाटील.

एरंडोल – एरंडोल तालुक्यासह मतदारसंघातील पारोळा, भडगांव तालुक्यात काही दिवसांपासुन सततचा पाऊस व ढगफुटीमुळे आतोनात नुकसान झाले आहे. जराही उसंत न घेतलेल्या पावसाने हाती आलेलं पीक जमीनदोस्त केलं आहे. शेतात अक्षरशः उभ्या पीकाचा चिखल पाहायला मिळत आहे. हाता तोंडाशी आलेलं उभं पीक ढगफुटी सदृष्य पावसामुळे मातीत गेलं आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पशुधन, शेती साधने, घरे, संसारोपयोगी साहीत्य यांचेतर नुकसान झालेच, यासह जनजीवन देखील पुर्णपणे विस्कळीत झाले.
या पार्श्वभूमीवर कालपासुनच मतदारसंघातील प्रभावित भागांचा आढावा घेण्यासाठी आमदार मा.अमोलदादा पाटील हे पाहणी करीत आहेत. आज त्यांनी एरंडोल तालुक्यातील गालापूर, ताडे, भातखेडा, हणमंतखेडेसिम, उत्राण गु.ह. व उत्राण अ.ह. तसेच भडगांव तालुक्यातील भातखंडे, अंतुर्ली बु, गिरड, मांडकी, बांबरूड, पिंपळगांव बु व भट्टगांव या प्रभावित भागात आमदार मा.अमोलदादा पाटील यांनी भेटी देत झालेल्या नुकसानीची पाहणी करून माय-बाप जनतेशी संवाद साधत, त्यांना धीर दिला.
झालेल्या नुकसानीतुन सावरणे, हे शक्यच नाही. परंतु समोर आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी धीर सोडु नका, माझ्यासह प्रशासन हे आपल्या सोबत खंबीरपणे उभे आहे. पंचनामे करण्यास कालपासुन सुरूवात झालेली असुन ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाला देखील विनंती केली असल्याचे आमदार मा.अमोलदादा पाटील यांनी सांगितले. यास्तव स्थानिक प्रशासनासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांना या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवुन सर्वोतोपरी मदत, सहकार्यासाठी माझ्याशी संपर्क साधन्याचे आवाहन आमदार मा.अमोलदादा पाटील यांनी केले.