अखंड हरिनाम सप्ताहाची स्थापना उत्साहात संपन्न. कासोदा…!
अखंड हरिनाम सप्ताहाची स्थापना उत्साहात संपन्न. कासोदा...!

एरोंडोल तालुक्यातील कासोदा येथे सालाबादाप्रमाणे यावर्षीही प.पू.संत श्री सदगुरु गोविंद महाराज व संत माहुजी महाराज यांच्या आशीर्वादाने ७२वर्षाची परंपरा असलेल्या खान्देशातील सर्वात मोठ्या उत्साहात साजरा होणारा कासोदा येथील अखंड हरिनाम किर्तन सप्ताह दिनांक ३१ ऑगस्ट रविवार रोजी स्थापना करण्यात आली. आज सकाळी ३ वाजेपासून ते ६ वाजेपर्यंत महादेव मंदीरात भटजी गणेश जोशी महाराजांनी शास्त्रोक्त पद्धतीने मंत्र उच्चारुण रमणाथ सोनार, दिनेश लोहार, समाधान चौधरी, किरण ठाकरे, समाधान घोडके यांनी सहपत्नीक महाभिषेक पुजा करण्यात आली.
दि.७ सप्टेंबर २०२५ रविवार रोजी सकाळी ६ वाजता काकडा आरती सुरुवात होईल.ह.भ.प. संभाजी महाराज अहिल्यानगर यांचे सकाळी ८: ३० ते १०:३० वाजता काल्याचे किर्तन होणार आहे. ११ वाजेपासुन महाप्रसाद वाटप सायंकाळी ६ वाजेपासुन पालखी मिरवणूक निघेल तरी कासोदा आणि परिसरातील सर्व भाविक भक्तांनी वरील कीर्तन श्रवणाचा व महाप्रसाद लाभ घ्यावा असे आवाहन येथील हरिनाम सप्ताह हिंदु पंच मंडळ यांनी केले आहे.