जुगार अड्ड्यावर कासोदा पोलिसांची धडक करवाई, सात जण पोलिसांच्या ताब्यात.
जुगार अड्ड्यावर कासोदा पोलिसांची धडक करवाई, सात जण पोलिसांच्या ताब्यात.

कासोदा : गावाजवळील गालापुर रोडवरील एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कासोदा पोलिसांनी छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले.
गालापूर रोड वर सुरु असलेल्या जुगार अड्याची गुप्त माहिती कासोदा पोलिसांना मिळताच त्यांनी जुगार अड्यावर धाड टाकून 7 जुगार खेळणाऱ्या वेक्तीना ताब्यात घेऊन करवाई करण्यात आली. माहितीनुसार या कारवाईत तब्बल ₹१,६६,३००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही धडक कारवाई ११ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात आली.
पोलिसांना जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोहीम राबवली. छाप्यातून ₹३३,८०/- रोकड, मोबाईल फोन व मोटारसायकल असा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक महेंद्र रेघे यांच्या आदेशानुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी सौ. कविता नेरकर-कालसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. छाप्यातील पथकात निलेश राजपूत (सहाय्यक पोलीस निरीक्षक), अकील मुजावर, समाधान तांडे, प्रशांत पाटील, कुणाल देवरे व योगेश पाटील यांचा समावेश होता.
कासोदा पोलिसांनी वेळेवर केलेल्या या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेला मोठ्या प्रमाणावरील जुगार अड्डा उद्ध्वस्त झाला असून, गाव परिसरात पोलीस कारवाईची चांगलीच चर्चा रंगली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शना खाली कासोदा पोलिस करीत आहेत.