Breaking
छत्रपती संभाजीनगरजळगावधुळेनंदुरबारनाशिकब्रेकिंगमहाराष्ट्र

एक लाख दहा हजारांची लाचेची मागणी भोवली: खाजगी पंटरसह महसूल सहायक, लाचखोर तहसिलदार सारंग चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

0 7 5 0 2 2

उपसंपादक – कल्पेश महाले

अहिल्यानगर – जप्त केलेली वाळूची वाहने सोडण्यासाठी एक लाख, दहा हजारांची लाच स्वीकारताना खाजगी पंटर सलील करीम शेख (38, रा.लक्ष्मी नगर, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर), महसूल सहाय्यक हरिष शिंदे व पैठण तहसीलदार सारंग भिकूसिंग चव्हाण (48, रा. ए विंग, फ्लॅट नंबर 305, द प्राईड इग्निमा, सुतगिरणी चौक, गारखेडा परिसर छत्रपती संभाजी नगर) यांना अहिल्यानगर एसीबीने अटक केली.

लाचखोर तहसिलदार सारंग चव्हाण, पैठण जि.छत्रपती संभाजीनगर

असे आहे लाच प्रकरण

32 वर्षीय तक्रारदार यांचा माती व वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांची वाळू वाहतुकीची दोन वाहने महसूल विभागाच्या पथकाने पकडली होती व दोन्ही वाहने तहसिल कार्यालय पैठण येथे जमा केली होती. तहसिल कार्यालयातील काम करणारे खाजगी इसम सलील शेख यांनी तक्रारदार यांची जप्त असलेली वाळू वाहतुकीचे दोन वाहने सोडण्याकरता स्वतः करीता व तहसिलदार चव्हाण याचे करिता 2,00,000/- रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यावेळी वाहने सोडण्याच्य प्रस्तावावर तहसिलदार चव्हाण पैसे दिले शिवाय सही करणार नाही म्हणून नाईलाजास्तव तक्रारदार यांनी खाजगी इसम सलील शेख यांना फोन पे द्वारे 40,000/- रुपये व 50,000/- रुपये रोख स्वरूपात दिले होते. तसेच हरीश शिंदे, महसूल सहाय्यक याने तक्रारदार यांच्याकडे दंडाच्या रकमेचे चलन काढून देण्याकरिता 50,000/- रुपये लाचेची मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांना नाईलाजास्तव 20,000/- रुपये दिले होते. प्राप्त लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 18/02/2025 रोजी पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता खाजगी पंटर सलील शेख याने तक्रारदार यांची जप्त असलेली वाळू वाहतुकीचे दोन वाहने सोडण्याकरता स्वतः करीता व तहसिलदार चव्हाण याचे करिता 1,10,000/- रुपयांची लाच मागणी केली व स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच दिनांक 18/2/2025 रोजी हरीश शिंदे, महसूल सहाय्यक याने तक्रारदार यांचे जप्त केलेल्या वाहनातील वाळू त्यांचे घरी टाकण्याचे सांगितल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडे वस्तूच्या स्वरूपात लाचेची मागणी केली असून दिनांक 24/2/2025 रोजी तक्रारदार यांच्याकडे 30,000/- रुपये लाचेची मागणी केली आहे. दिनांक 3/3/2025 रोजी आयोजित सापळा कारवाई दरम्यान यातील खाजगी पंटर सलील शेख याने तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष लाच रक्कम 1,10,000/- रुपये स्वीकारली आहे.

18/2/2025 रोजी पडताळणी कारवाईदरम्यान तक्रारदार यांनी सलील शेख यांना फोन केला असता त्यांनी ते तहसीलदार साहेबांच्या सोबत असल्याचे सांगितले व जेव्हा तहसीलदार सारंग चव्हाण याची शासकीय गाडी तहसील कार्यालयात आली त्यावेळी सलील शेख तहसीलदाराच्या शासकीय गाडीतूनच खाली उतरला. लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर सलील शेख याचे वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनात तहसिल कार्यालयातील तहसिलदाराच्या सह्या असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या फाईल मिळून आल्या. सलील याचे मोबाईल मधील व्हाट्सअप चेक केले असता त्यामध्ये सलील याने कार्यालयीन पत्र व्यवहार तहसिलदाराच्या व्हाट्सअप वर पाठवून तो बरोबर आहे का ते चेक करण्यास सांगितले असता तहसिलदार सारंग चव्हाण याने बरोबर असल्याचे सांगितले आहे. यावरून तहसिलदार चव्हाण याने खाजगी इसम सलील शेख यास तहसिल कार्यालयातील सुविधा पुरवून तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करण्यास व स्वीकारण्यास अपप्रेरणा व प्रोत्साहन दिले आहे. सदर बाबत तिन्ही आरोपींविरुद्ध पैठण पोलीस स्टेशन, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, पोलीस निरीक्षक राजु आल्हाट, हवालदार संतोष शिंदे, पोलीस अंमलदार रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, चंद्रकांत काळे, गजानन गायकवाड, चालक हारून शेख, चालक दशरथ लाड आदींच्या पथकाने केली.

रात्रीच घेतली घरझडती

तहसीलदार चव्हाण संभाजीनगर शहरातील गारखेडा परिसरातील सूतगिरणी चौकात असलेल्या उच्चभ्रू प्राईड इनिग्मा येथे फ्लॅटमध्ये राहतो. अहिल्यानगरच्या पथकाने रात्रीच त्याच्या घराची झडती घेतली. मात्र, घरात फार काही आढळून आले नाही. केवळ १२ हजाराची रोख सापडली असल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र त्याच्या मालमत्ता व अन्य संपत्तीचा शोध घेतला जात आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 0 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे