कासोदा पोलिसांची धडाकेबाज कारवाई चाकूने हल्ला करून जीवे मारण्याच्या प्रयत्नातील फरार आरोपी २४ तासात अटकेत …!
कासोदा पोलिसांची धडाकेबाज कारवाई चाकूने हल्ला करून जीवे मारण्याच्या प्रयत्नातील फरार आरोपी २४ तासात अटकेत ...!

एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस स्टेशन हहीत हनुमंतखेडे बु।। या गावातील मराठी शाळेच्या आवारात सार्वजनिक ठिकाणी लग्णातील बँडची गाडीपुढे घेण्याच्या कारणावरुन गुन्ह्याती फिर्यादी व आरोपी यांच्या वाद झाला
जिवेठार मारण्याच्या प्रयत्नातील गुन्ह्यात सर्व आरोपीतांचा शोध लावून 24 तासांच्या आत अटक केले कासोदा पोलीस स्टेशन हहीत
दिनांक-२४/०२/२०२६रोजी दुपारी २.१० वाजेच्या सुमारा हनुमंतखेडे बु।। ता. एरंडोल गावी मराठी शाळेच्या आवारात सार्वजनिक ठिकाणी लग्णातील बँडची गाडीपुढे घेण्याच्या कारणावरुन गुन्ह्याती फिर्यादी व आरोपी यांच्या वाद झाला. सदर घटनेत आरोपी १) महेश प्रकाश वेडसे (पाटील) २) गौरव विजय बहिरम (पाटील) यांनी फिर्यादो अरुण भिला पाटील यांना मारहाण केली तसेच आरोपी क्र. ३) संदिप धोंडू बेडसे (पाटील) याने त्याच्या हातातील चाकुने वार करुन जिवठार मारण्याच्या प्रयत्न केला सदर घटना घडत असतांना साक्षिदार विनय विकास उर्फ भैय्यासाहेब पाटील यांना सुद्धा दुखापत केली वावरुन कासोदा पोलीस स्टेशन वेथे गुन्हा रजिष्टर नंबर-0030/2026 भा.न्या.सं-2023 चे कलम 109,115(2), 352,351(2),351(3), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी हे गुन्हा करुन घटनास्थळावरुन पसार झाले होते. गुन्ह्यातील आरोपीतांबाबत कोणताही तांत्रीक आधार नसतांना गोपनिय यंत्रणे मार्फत माहिती काढून कसोशीने तपास करुन पथक तयार करुन वेगवेगळ्या ठिकाणांवरुन तिघं आरोपीतांना 24 तासांच्या आत ताब्यात घेवुन अटक करुन मा. न्यायालयापुढे हजर केले आहे. आरोपीतांच्या शोध मोहीमेच्या पथकात सपोनि श्रीकांत पाटील, पोउनि धर्मराज पाटील, पोहेकों/नितीन सुर्यवंशी पोहेका/नंदलाल परदेशी पोहेकॉ किरण गाडीलोहार पोना/अकिल मुजावर पोकों/प्रशांत पगारे, पोकों/योगेश पाटील, पोकों/कुणाल देवरे, पोकों लहु हटकर होमगार्ड/नितीन पवार असे होते.
सदर आरोपी अटक मोहीम मा.पोलीस अधिक्षक सो, जळगाव श्री, महेश्वर रेड्डी सर, मा. अपर पोलीस अधिक्षक सो. चाळीसगाव परिमंडळ श्रीमती, कविता नेरकर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, चाळीसगाव भाग श्री, विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली.



