मेहुणबारे पोलीसांकडून शेती उपयुक्त साहित्य चोरी करणाऱ्या दोघांना अटक; ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

उपसंपादक – कल्पेश महाले
मेहुणबारे – प्रितम पुरुषोत्तम बागुल, वय – 26 वर्षे, रा. चिंचगव्हाण, ता. चाळीसगांव यांच्या मालकीच्या सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.19 ई.ए. 3234 हे शेडमध्ये लावून ठेवलेले असताना कोणीतरी अज्ञात इसमाने सदर ठिकाणी येवून नमुद ट्रॅक्टरचे ट्रॉली जोडण्याचे डाबर व पिना तसेच रोटर, नांगर जोडण्यासाठी आवश्यक असणारे आडवे उभे हात असे एकूण 50,000/- रुपये किंमतीचे स्पेअर पार्ट खोलून चोरुन नेलेबाबत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजि. 137/25 भा.न्या.सं. कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, व उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे, यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार केले होते. या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा उघडकीस आणून 1) प्रवीण जालींधर पाटील व 28 वर्षे, 2)दिलीप श्रीराम निकम, वय 22 वर्षे दोघे रा. चिंचगव्हाण ता. चाळीसगांव जि. जळगांव यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हयाची कबुली देवून गुन्हयातील नमुद ट्रॅक्टरचे चोरी केलेले एकूण 50,000/- रुपये किंमतीचे नमुद स्पेअर पार्ट काढून दिले असून ते जप्त करण्यात आलेले आहेत. या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कस्टडी दिली आहे.
सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे, पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोहेकॉ.मोहन सोनवणे, किशोर पाटील, शांताराम पवार, पोकॉ.विनोद बेलदार यांनी केली आहे.