Breaking
ब्रेकिंग

कासोदा श्री सद्गुरु गोविंद महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता उत्साहात; काकड आरतीस मंत्री गुलाबराव पाटील, आमदार अमोलदादा पाटील यांची उपस्थित….!

कासोदा श्री सद्गुरु गोविंद महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता उत्साहात; काकड आरतीस मंत्री गुलाबराव पाटील, आमदार अमोलदादा पाटील यांची उपस्थित....!

1 1 2 9 9 7

सत्यकाम न्यूज डिजिटल मीडिया नेटवर्क कासोदा

इमरान शेख उपसंपादक

कासोदा येथे , दि. २६ सप्टेंबर  २०२६ रोजी श्री सद्गुरु गोविंद महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचा सांगता सोहळा आज दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक ६ वाजता महा काकड आरतीने अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.

या महा काकड आरती सोहळ्यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. गुलाबराव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत एरंडोल मतदारसंघाचे आमदार अमोलदादा पाटील, तहसीलदार साहेब व सर्व शासकीय पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी हिंदू पंचमंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार व सर्व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून सद्गुरु गोविंद महाराजांचे दर्शन घेऊन महा काकड आरती केली.

आज सांगता सोहळ्याच्या दिवशी पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. सात दिवस चाललेल्या या सप्ताहात दररोज कीर्तन, भजन, प्रवचनाचा कार्यक्रम झाला.

आज सातव्या दिवशी सकाळी काल्याचे कीर्तन सुरू असून, दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतील. तर संध्याकाळी भव्य पालखी मिरवणुकीने या सप्ताहाची सांगता होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 2 9 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे