Breaking
छत्रपती संभाजीनगरजळगावधुळेनंदुरबारनाशिकब्रेकिंगमहाराष्ट्र

जळगाव प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटीलसह खाजगी पंटरला तीन लाखांची लाच घेतांना एसीबीकडून अटक

0 5 3 3 8 8

उपसंपादक – कल्पेश महाले 

जळगाव – नवापूर चेक पोस्ट वर येथे नोव्हेंबर २०२४ या महिन्यात नियुक्ती दिल्याचा मोबदला म्हणून आरटीओ विभागाच्या निरीक्षकाकडून तीन लाखांची लाच स्वीकारल्यानंतर जळगाव जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह एका खाजगी पंटरास छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या पथकाने अटक केल्याने आरटीओ कार्यालयामधील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. दीपक अण्णा पाटील, वय-५६ असे अटकेतील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे तर भिकन मुकुंद भावे, वय-५२ (रा. प्लॉट न ९८, आदर्श नगर, जळगाव) असे खाजगी पंटरचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण

५५ वर्षीय तक्रारदार हे आरटीओ अधिकारी असून त्यांची नोव्हेंबर महिन्यात नवापुर चेक पोस्टवर बदली करण्यात आल्यानंतर त्या मोबदल्यात जळगाव प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी भिकन भावे खाजगी पंटराच्या माध्यमातून ४ नोव्हेंबर २०२४ रोजी तीन लाखांची लाच मागितली होती. मात्र या आरटीओ अधिकारीला लाच द्यावयाची नसल्याने या अधिकाऱ्याने छत्रपती संभाजीनगर विभागीय लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून भिकन भावे याने मेहरून तलावाजवळील लेक अपार्टमेंट आज गुरुवार दि.५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी तीन लाखांची लाच स्वीकारताच रंगेहात एसीबी पथकाकडून अटक करण्यात आली. व नंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांस आरटीओ कार्यालय जळगाव येथून ताब्यात घेण्यात आले. दोघा आरोपींविरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आरटीओ अधिकारी कडून मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता

प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील याच्या कोल्हापूर, ठाणे, अहिल्यानगर, सांगली येथील घरांची चौकशी सुरू असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली असून त्यात काय सापडले याची माहिती कळू शकली नाही.

या पथकाने केला सापळा यशस्वी

छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस, हवालदार अशोक नागरगोजे, युवराज हिवाळे, विलास चव्हाण, सचिन बारसे, सी.एन.बागुल यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 3 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे