Breaking
छत्रपती संभाजीनगरजळगावधुळेनंदुरबारनाशिकब्रेकिंगमहाराष्ट्र

पत्रकारांवरील हल्ल्याचा चाळीसगावात तीव्र निषेध; पत्रकारांवरचे हल्ले सहन केले जाणार नाहीत व्हॉईस ऑफ मीडिया जळगाव जिल्हाध्यक्ष – कल्पेश महाले

0 9 1 2 9 8

प्रतिनिधी – कलीम सैय्यद

पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध – व्हॉईस ऑफ मीडिया

चाळीसगाव डीवायएसपी आणि चाळीसगाव तहसिलदार यांना निवेदन सादर

चाळीसगाव – त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तास चे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्ही चे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूज चे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी केलेल्या भीषण हल्ल्याचा तीव्र निषेध व्हॉईस ऑफ मीडिया चाळीसगाव तर्फे करण्यात आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर संघटनेतर्फे चाळीसगाव डी.वाय.एस.पी. व चाळीसगाव तहसिलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे पत्रकारांवरील वारंवार होणाऱ्या हल्ल्यांविषयी तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.  जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले  यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ठळकपणे मांडण्यात आला.

चाळीसगाव डीवायएसपी विजयकुमार ठाकूरवाड यांना निवेदन देताना व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी व सदस्य

कल्पेश महाले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले – “पत्रकार समाजाचा कणा आहेत. सत्य आणि न्यायासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पत्रकारांवर होत असलेले हल्ले ही लोकशाहीला काळिमा फासणारी बाब आहे. दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, ही गंभीर बाब आहे. दोषींवर या कायद्यान्वये तातडीने कारवाई झाली पाहिजे. अन्यथा पत्रकारांच्या सुरक्षेसाठी मोठा संघर्ष उभारावा लागेल. पत्रकारांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत.” निवेदनातील प्रमुख मागण्या हल्लेखोरांना तातडीने अटक करून पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी. राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी शासनाने ठोस व कडक धोरण आखावे.

या प्रसंगी जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले, जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील, चाळीसगाव तालुकाध्यक्ष संतोष भोई, शहराध्यक्ष गफ्फार शेख, तालुका उपाध्यक्ष महेंद्र महाले, तालुका संघटक सोजिलाल हाडपे, तालुका सहसंघटक अजगर मुल्ला, शहर उपाध्यक्ष रविंद्र कोष्टी, शहर सल्लागार आनंद गांगुर्डे, शहर संघटक रणधीर जाधव, कार्यकारणी सदस्य राकेश निकम, सुरेश परदेशी, जितेंद्र चौधरी, वाल्मीक गरुड, कलीम सैय्यद यावेळी  उपस्थित होते.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 2 9 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे