भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती दिवसानिमित्त कासोदा येथे जयंती साजरी करण्यात आली..!
भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती दिवसानिमित्त कासोदा येथे जयंती साजरी करण्यात आली..!

कासोदा प्रतिनिधीः-
कासोदा :एरोंडोल तालुक्यातील कासोदा येथे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीव राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त एकता दौड (रन फॉर युनिटी) प्रशासनाच्या वतीने काढण्यात आली.
या एकता दौडला मोठा प्रतिसाद मिळाला. कासोदा पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी, अंमलदार, होमगार्ड पोलीस पाटील, नागरिक, महिला, युवा वर्ग नागरिकांच्या वतीने ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७वाजता ही एकता दौड पार पडली. एरंडोल-भडगाव रोडवरील श्री. सद्गुरू गोविंद महाराज प्रवेशद्वार सेंट्रल बँक समोरून रॅलीचा शुभारंभ पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.
एरंडोल रस्त्यावरील श्रीराम मंदिर, कासोदा ग्रामपंचायत, छत्रपती शिवाजी महाराज नगर बस स्टॉप, मार्केट कमिटी, शनिमहाराज मंदिर चौक, एरंडोल-भडगाव रोड या मार्गाने एकता दौड काढण्यात आली. या एकता दौडमध्ये विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, युवा वर्ग, पोलीस अधिकारी, अंमलदार, होमगार्ड पोलीस पाटील, शाळा-कॉलेज चे विद्यार्थी सहभागी झाले होते.
यां दरम्यान पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांनी मार्गदर्शन करत सर्वांना रॅलीचे महत्व सांगून, एकतेची शपथ दिली.



