शिरपूर फर्स्टच्या वतीने शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी २७ ऑक्टोबर रोजी शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा ..!!
शिरपूर फर्स्टच्या वतीने शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी २७ ऑक्टोबर रोजी शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा ..!!

शिरपूर तालुका प्रतिनिधी:- संजय व पाटील
शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त तालुका म्हणून घोषित करावा, थकीत पिकविमा तात्काळ मिळावा, सरकारने दिलेल्या अश्वासनानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असे विविध प्रश्न घेऊन हा मोर्चा सोमवार, दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता करवंद नाका येथून निघणार असून, शिरपूर तहसील कार्यालयापर्यंत भव्य प्रात्यक्षिक होणार आहे.
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी प्रत्येक शेतकरी, शेतमजूर, तरुण व ग्रामस्थांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिरपूर फर्स्टच्या वतीने करण्यात आले आहे.
या मोर्चात जास्तीत जास्त शेतकरी उपस्थित रहावे, यासाठी रोज तालुक्यातील गावागावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी देखील प्रचंड प्रतिसाद दर्शवला आहे.
शिरपूर तालुक्याला अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करावे. प्रशासनाने जाहीर केलेल्या GR मध्ये धुळे जिल्ह्यातील तिन्ही तालुके असतांना फक्त शिरपूर तालुक्याचे नाव वगळण्यात आले आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. थकीत पीकविमा तात्काळ मिळावा, सरकारने दिलेल्या अश्वासनानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असे विविध विषय घेऊन हा मोर्चा निघणार आहे.
शिरपूर तालुक्यातील सरपंच-उपसरपंच, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी-माजी भावी सगळेच. तालुक्यातील सर्व राजकीय-सामाजिक संघटना-पक्ष यांना ह्या पत्राच्या माध्यमातून नम्र विनंती करतो की, हा तालुक्यातील शेतकऱ्यांचा विषय आहे, आपण कुठल्याही आमंत्रणाची वाट न पाहता. आपल्या गावातील परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपण मोर्चात आणावे. गावातून शेतकऱ्यांना येण्याचा मार्ग करून द्यावा. मोर्चाचे नेतृत्व करणारे ही आपणच आहात जबाबदारीने ह्या लढ्यात सहभागी व्हा. शेतकरी एकजुटीची ताकत दाखवून द्या.
या लढ्यात राजकीय पक्षभेद, जातभेद, संघटनाभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे, हीच आमची नम्र विनंती आहे. आता शेतकरी लढायला तयार आहे त्याला आपली साथ हवी. आपल्या उपस्थितीने या मोर्चाला बळ मिळेल आणि शासनाला शेतकऱ्यांचा आवाज अधिक प्रभावीपणे पोहोचेल.
दिनांक – २७ ऑक्टोबर, सोमवार रोजी
सकाळी १० वाजेला,
करवंद नाका ते शिरपूर तहसील कार्यालय शिरपूर
शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा समिती, शिरपूर



