Breaking
छत्रपती संभाजीनगरजळगावधुळेनंदुरबारनाशिकब्रेकिंगमहाराष्ट्र

कर्कश आवाज करणाऱ्या ४१ बुलेटच्या सायलेन्सरवर चाळीसगाव शहर वाहतुक पोलीसांनी फिरवले रोलर.

0 7 5 7 0 7

उपसंपादक – कल्पेश महाले

चाळीसगाव शहर वाहतूक शाखेकडून १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत ३९ लाख ६५ हजार १०० रुपयांचा दंड वसूल 

चाळीसगाव – शहरात रात्री अपरात्री फटाके किंवा बंदुकीतुन गोळी सुटल्याप्रमाणे आवाज करणाऱ्या सायलेन्सरचा वापर बुलेट चालक करतात. नागरिक फटाक्यासारख्या आवाजामुळे दचकून जागे होतात. अशा कर्कश सायलेन्सरचा वापर करणाऱ्या बुलेट चालकांविरुद्ध चाळीसगाव शहर वाहतुक शाखेच्या पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीसांनी अशा तब्बल ४१ बुलेट चालकांविरुद्ध कारवाई करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. तसेच सायलेन्सरवर बुलडोझर चालवण्यात आले. पोलीसांनी केलेल्या कारवाईचे शहरातील नागरिकांकडून स्वागत होत आहे.

चाळीसगाव शहरात बुलेट चालक भरधाव वेगाने जातात. सायलेन्सरमधून मोठ्याने कर्कश फटाके फुटल्यासारखे आवाज येतात, अशा तक्रारी नागरिकांनी पोलीसांकडे केल्या होत्या. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.महेश रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्यासह पथकाने गेल्या काही दिवसापासून बुलेटचे कर्कश आवाज करणारे सायलेन्सर कारवाईची मोहीम सुरू केली. यामध्ये ४१ मोटारसायकल चालकांवर कारवाई करण्यात आली. या बुलेटच्या ४१ सायलेन्सरवर बुलडोझर चालवले. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासह कर्कश आवाज करणारे सायलेन्समुळे नागरिकांना त्रास होत असेल तर त्यांनी ही बाब वाहतुक शाखेच्या पोलीसांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. दरम्यान या संदर्भातील ही कारवाई सातत्याने सुरू असली पाहिजे. तरच असे प्रकार करणाऱ्या बुलेट धारकांवर वचक बसेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

ड्रंक अँन्ड ड्राइव्हचे २५ खटले

दारू पिवून वाहन चालवणे गैर आहे. असे असूनही दारू पिवून वाहने चालवणाऱ्या वाहनधारकांवर चाळीसगाव शहर वाहतुक शाखेने वर्षभरात कारवाईचा बडगा उगारून २५ वाहन धारकांवर ड्रंक अँड ड्राइव्हचे खटले न्यायालयात दाखल केले आहेत.

चाळीसगाव शहरात बुलेट चालकांचा धुमाकूळ वाढला असून बेजबाबदारपणे वाहन चालवल्याच्या घटना वाढल्या आहेत. ज्यामुळे इतर वाहनचालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या बुलेट गाड्यांना कर्कश आवाज असणारे सायलेन्सर बसविण्यात येतात. अशाप्रकारच्या सायलेन्सरवर बंदी घालण्यात आली आहे. असे असूनही शहरात सर्रास असे सायलेन्सर बसवण्यात येतात. त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

५,५०० वाहनांवर कारवाई; नियमांचे पालन करून सहकार्य करा.

वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांच्या विरोधात शहर वाहतुक शाखेने कारवाईचा बडगा उगारला. वर्षभरात ५ हजार ५०० वाहनधारकांवर वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करून सुमारे ३९ लाख ६५ हजार १०० रूपये इतका दंड वसूल केला. यापुढेही ही मोहीम सुरूच राहणार असून नागरिकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे.

– प्रदीप एकशिंगे, सहाय्यक पोलीस निरिक्षक, चाळीसगाव शहर वाहतूक शाखा

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 7 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे