Breaking
ब्रेकिंग

भडगाव येथे मोहरम सणानिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न…!

भडगाव येथे मोहरम सणानिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न...!

1 0 2 5 2 9

भडगाव प्रतिनिधी:-हय्युम अली सैय्यद

भडगाव येथील पोलीस ठाण्याच्या सभागृहात आगामी मोहरम सणाच्या निमित्ताने भडगाव शहरात शांतता, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भडगाव पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीच्या अध्यक्षस भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश टाक साहेब होते.या बैठकीत मोहरमचा सण परंपरेनुसार आणि अत्यंत उत्साहात, मात्र शांततापूर्ण वातावरणात साजरा व्हावा, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता, सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य कायम राखण्याचे आवाहन यावेळी भडगाव पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.

ताजिया मिरवणुकीचा मार्ग, वेळेचे नियोजन आणि संवेदनशील ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्याबाबतही या बैठकीत एकमत झाले.

तसेच, सणादरम्यान कुणीही कायदा व सुव्यवस्था बाधक ठरेल असे कृत्य केल्यास अथवा सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवा पसरवल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही भडगाव पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला.

परिसरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य, मुस्लिम समाजाचे मानकरी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी सण शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले

त्या वेळी उपस्थित. नगरसेवक इमरान अली सय्यद.समाजसेक आसिम भाई मिर्झा, हाजी जाकीर कुरेशी, अलीम शहा.हाजी बब्बू सेट.युनस खान सर्व समाज बांधव, उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 2 5 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे