Breaking
ब्रेकिंग

भडगाव शहरातील  जिल्हा परिषद उर्दू शाळा यशवंत नगर येथे विद्यार्थ्यांना वह्या, व साहित्याचे उत्साहात वाटप संपन्न…!

भडगाव शहरातील  जिल्हा परिषद उर्दू शाळा यशवंत नगर येथे विद्यार्थ्यांना वह्या, व साहित्याचे उत्साहात वाटप संपन्न...!

1 0 3 2 9 1

भडगाव प्रतिनिधी :-हय्युम अली सैय्यद

भडगाव शहरातील जिल्हा परिषद उर्दू शाळा यशवंतनगर येथे आज ३० जून रोजी  शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय , वह्या व इतर साहित्याचे मोफत वाटप कार्यक्रमाचे आयोजन संपन्न.हा कार्यक्रम हाजी मोसीन मुनाफ खाटीक यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच एका प्रेरणादायी पुस्तक व शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत परिसरातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके, वह्या व इतर साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना समजसेवक हाजी मोसीन मुनाफ खाटीक यांनी, वाचन संस्कृती ही माणसाला समृद्ध करते आणि शिक्षणाशिवाय कोणताही समाज प्रगती करू शकत नाही,असे विचार मांडले. तसेच विद्यार्थ्यांनी पुस्तकांची मैत्री करून जीवनात उच्च ध्येय बाळगावे, असे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मान्यवरांच्या उपस्थितीत

वह्या, आणि शैक्षणिक संच सुपूर्द करण्यात आले. साहित्याचे वाटप होताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन हाजी मोसीन मुनाफ खाटीक यांच्या तर्फे  करण्यात आले.होते

याप्रसंगी शाळा व्यवस्था समितीचे अध्यक्ष पत्रकार हय्युम सय्यद व उपाध्यक्ष नाझिम मेहमूद शेख व सर्व सदस्य, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक शेख खालील सर, शिक्षक अब्दुल जावेद सर, सय्यद शाहिद सर, तसलीम खान सर,नूर सर,जुनेद सर,मुफ्ती शकील साहेब, मुलांचे डाँ, अफरोज शेख. माजी मुख्याधपक शेख अरिफ सर.व पालक वर्ग उपस्थित होते

शेवटी हाजी मोसीन मुनाफ खाटीक यांनी उपस्थितांचे आभार मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 3 2 9 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे