कासोद्यातील आर्यन इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात संपन्न…!
कासोद्यातील आर्यन इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात संपन्न...!

इमरान शेख उपसंपादक
कासोदा, येथे दि. 15 ऑगस्ट रोजी देशाच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त* कासोदा येथील आर्यन इंटरनॅशनल स्कूल मध्ये देशभक्तीचा जल्लोष, उत्साह आणि शिस्तबद्ध वातावरणात कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व राष्ट्रगीताने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, गीत, परेड, सूत्रसंचालन आणि सांस्कृतिक नृत्याचे अप्रतिम सादरीकरण केले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, शिस्त आणि कलागुण यांची झलक कार्यक्रमात दिसून आली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला दाद दिली.
या प्रसंगी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र सजन गजरे म्हणाले, “विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवून त्यांना संधी दिल्यास ते आपल्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी करू शकतात. संपूर्ण शाळा परिवार एकत्रितपणे प्रयत्न केल्यास यशाची नवी उंची गाठता येते.”
कार्यक्रमाच्या यशासाठी शिक्षकांचे नियोजन, मार्गदर्शन आणि सराव तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या चालकांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी आणि कार्यक्रमास उपस्थित राहून प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचेही शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.
विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कर्मचारी यांच्या एकजुटीमुळेच हा स्वातंत्र्यदिन सोहळा संस्मरणीय ठरला,” असे गजरे सरांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाची सांगता “जय हिंद! जय भारत! वंदे मातरम्!”च्या घोषणांनी झाली.



