गुंडांचे धाबे दणाणले! सुरक्षित जळगाव’साठी पोलिसांची धडक कारवाई आणि कोंबिंग ऑपरेशन…!
गुंडांचे धाबे दणाणले! सुरक्षित जळगाव'साठी पोलिसांची धडक कारवाई आणि कोंबिंग ऑपरेशन...!

जिल्हा प्रतिनिधी :- कलिम सैय्यद
जळगावात पोलिसांचे पहाटे ‘कोंबिंग ऑपरेशन’; अवघ्या ३ तासांत १२५ अट्टल गुन्हेगार जेरबंद!
जळगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने भल्या पहाटे अत्यंत धडक व धडाकेबाज ‘कोंबिंग ऑपरेशन’ मोहीम राबवली आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या विशेष कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
कारवाईसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त, RCP तसेच स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे . कारवाईदरम्यान संशयित व सराईत गुन्हेगारांच्या निवासस्थानी झडती ,वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.तसेच संशयास्पद व मालकीबाबत खात्री नसलेली वाहने पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात येत आहेत . अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुंडांना पोलिस स्टेशन ला आणण्यात येत आहे आणि इंट्रोगेशन फॉर्म भरून पुढील प्रतिबंधात्मक कारवाही आणि आवश्यकते नुसार गुन्हे दाखल करण्यात येत आहे .
जळगाव शहरातल्या वेगवेगळ्या ६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही संयुक्त धडक मोहीम राबवण्यात आली.वेगवान कामगिरी पहाटेच्या अंधारात अवघ्या ३ तासांत तब्बल १२५ सराईत गुन्हेगारांना शोधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत
पोलिसांचा मोठा ताफा: गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता..



