कार्यकारी संपादक – संजय महाजन
कजगाव ता.भडगाव – कजगाव कडून चाळीसगांव कडे जाणारा ट्रक भोरटेक फाट्यावरील वळणावर पलटी झाल्याने यात दोन जण जखमी झाले जखमींना उपचारासाठी चाळीसगांव रवाना करण्यात आले आहे काल दि.१ नोव्हेंबर रोजी दुपारी कजगाव कडून चाळीसगांव कडे जाणारा ट्रक भोरटेक फाट्यावरील वळणावर पलटी झाला यात मोठी प्राणहानी टळली अमरावती येथुन ट्रक क्रमांक डी.डी.०१ पी.९३०८ कच्चा दोरा भरून मालेगाव – नांदगाव येथे जात असताना भोरटेक फाट्यावरील वळणावर पलटी झाला पलटी झालेला ट्रक सरळ इलेक्ट्रिक खांबावर आदळला सुदैवाने सदर चा खांब जवळच्या निंबा च्या झाडावर टेकला गेल्याने सुरू असलेल्या वीज पुरवठा च्या तारा देखील या झाडावर अडकल्याने मोठी दुर्घटना टळली सदर घटना याच मार्गावरून जाणाऱ्या भडगाव चे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या समोर घडल्याने त्यांनी तात्काळ कजगाव पोलीस मदत केंद्रावरील सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे पोलीस नाईक नरेंद्र विसपुते यांना घटनास्थळी बोलवत आणि उपस्थित नागरिकांच्या मदतीने ट्रक मध्ये अडकलेले पवन अहिरे जखमी चालक व एक अन्य या दोघांना बाहेर काढत रुग्णवाहिके ने चाळीसगांव रुग्णालयात रवाना केले.
मोठी दुर्घटना टळली
भोरटेक फाट्या वरील वळण अत्यंत घातक आहे दोन गावातील रहदारी च्या जागी हे वळण आहे ट्रक पलटी झालेल्या जागी कायम वरदळ असते केवळ सुदैवाने तेथे वर्दळ नव्हती तसेच इलेक्ट्रिक खांब झाडावर पडले अन्यथा दुर्घटना येथे घडली असती.