Breaking
आरोग्य-शिक्षणजळगावधुळेनंदुरबारनाशिकब्रेकिंगमहाराष्ट्र

चाळीसगाव येथील अचिवर्स विद्यानिकेतन ज्यु. कॉलेजचा १२ वी विज्ञान शाखेचा निकाल १०० %

0 7 8 2 7 2

उपसंपादक – कल्पेश महाले

चाळीसगाव – तालुक्यातील तांबोळे फाटा हिरापूरयेथील अचिवर्स विद्यानिकेतन ज्यु. कॉलेजचा बारावी विज्ञान शाखेचा निकाल १००% लागला असून यामध्ये अश्विनी सदाशिव तोंडे हिने 82.67 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक, मोहित दीपक पवार याने 77.67 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक व रोहित गणेश मराठे याने 77.00 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक, हरीश संदीप पाटील याने 75.33 टक्के गुणांसह चौथा क्रमांक तर अभिषेक गोरख पगार व गौरवी राहुल जगताप या दोघांनी 74.83 टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला असून सदरील विद्यार्थ्यांना जितेंद्र ठाकरे सर, रुपाली सूर्यवंशी मॅडम व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष शरद पाटील व सचिव पल्लवी पाटील व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. विद्यार्थ्यांना जेईई, नीट, एमएचटी – सीईटी व अन्य स्पर्धा परीक्षासाठी तज्ञ मार्गदर्शकांच्या शिबिरांचे आयोजन या विद्यालयामार्फत करण्यात येते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सुविधा पुरवून त्यांचा सर्वांगीण विकास साधने व सक्षम नागरिक घडवणे हाच एक या संस्थेचा उद्देश आहे असे यावेळी संस्थेचे अध्यक्ष शरद पाटील यांनी सांगितले.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 8 2 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे