(उपसंपादक – कल्पेश महाले)
मुंबई – राज्यातील लाडशाखीय वाणी या जाती समुदायातील नागरिकांचे चाळीसगाव मतदारसंघात नुकतेच राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न झाले आहे. सदर अधिवेशनात शासनाकडे त्यांनी विविध मागण्यांचे केलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे बाबत मागणी करण्यात आली होती. याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी तातडीने पावले उचलत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्टमंडळासोबत भेट घेऊन निवेदन सादर केले होते, त्यावर मुख्यमंत्री यांनी तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याच्या बहुजन कल्याण विभागास दिले होते त्यानुसार आज दि.१० ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश
राज्यात लाडशाखीय वाणी समाजाची संख्या बहुसंख्य आहे. समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळाचा हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार असून याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, आमदार मंगेश चव्हाण यांचे वाणी समाजातर्फे आभार मानण्यात आले आहेत.