कासोदा पोलिसांचा गोवंश तस्करांवर कारवाईत वाहनासह जिवंत गोवंश जप्त…!
कासोदा पोलिसांचा गोवंश तस्करांवर कारवाईत वाहनासह जिवंत गोवंश जप्त...!

जळगाव जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक आणि कत्तलीच्या प्रकारांवर पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला असून, या मोहिमेत कासोदा पोलिसांनी मोठी कारवाई करत एक आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत जिवंत गोवंशासह वाहन असा तब्बल १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ मे रोजी कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत संशयास्पदरीत्या गोवंश वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती स.पो.नि. श्रीकांत पाटील यांना मिळाली. तत्काळ पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली असता शेख समीर शेख जाबीर याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले. यावेळी पोलिसांनी १,५०,००० रुपये किमतीचे वाहन आणि ४०,००० रुपये किमतीचे ३ जिवंत गोवंश जप्त केले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्यावरच न थांबता, गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांवर मोटार परिवहन विभागामार्फतही कडक
३ गोवंशांसह १.९० लाखांचा मुद्देमाल हस्तगत का
यांदा योनीम स्टेनज दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्ह्यात गोवंश हत्या आणि अवैध वाहतूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असा कडक इशारा पोलीस प्रशासनाने दिला असून आगामी काळात ही मोहीम आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव) व संदीप गावित (जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, पीएसआय धर्मराज पाटील, पोलीस कर्मचारी नितीन सूर्यवंशी, नरेंद्र पाटील, योगेश पाटील आणि कुणाल देवरे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.



