Breaking
जळगावधुळेनंदुरबारनाशिकब्रेकिंगमहाराष्ट्र

१५ हजार रुपयांची लाच स्विकारतांना जळगाव महानगरपालिकेतील नगररचना सहाय्यक जळगाव एसीबीच्या जाळ्यात.

0 5 3 3 8 7

उपसंपादक – कल्पेश महाले

जळगाव – तक्रारदार पुरुष वय-34, रा.खेडी बु.जि. जळगाव येथील असून तक्रारदार यांच्या बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेले घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण मंजूर करण्यासाठी परवानगी साठी नगर रचना विभाग महानगरपालिका जळगांव येथे एकूण ३ प्रकरणे दाखल केली आहेत. त्यात पहिल्या प्रकरणात पडताळणी करण्यासाठी पाठवले असता मनोज समाधान वन्नेरे, वय ३४ वर्षे, नगररचना सहाय्यक, नगररचना विभाग , महानगरपालिका जळगाव याने पहिल्या प्रकरणात २१,००० रुपये व तडजोड अंती १५,००० व दुसऱ्या प्रकरणात १५,००० रुपयाची लाच मागितली होती. तसेच आयुक्त, मनपा जळगाव व सहाय्यक संचालक (अतिरिक्त कार्यभार ) नगर रचना विभाग, मनपा जळगाव यांचेसाठी एकूण ३०,००० रुपये ची लाचेची मागणी केली होती. पहिल्या प्रकरणातील १५,००० रुपयांची लाच आज दिनांक ९ डिसेंबर २०२४ रोजी रंगेहात स्विकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई

जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पो.ना.किशोर महाजन, राकेश दुसाने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 3 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे