सुप्रीम कोर्ट ज़िंदाबाद संविधान ज़िंदाबाद लोकतंत्र की पहचान सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णया !
सुप्रीम कोर्ट ज़िंदाबाद संविधान ज़िंदाबाद लोकतंत्र की पहचान सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णया !

जळगांवा प्रतिनिधी
अल्लाहचे आभार सह मिठाई वाटून जल्लोष साजरा
वक्फ सुधारणा कायदा २०२५ वर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे वक्फ बचाओ समिती आणि एकता संघटनेने जोरदार स्वागत केले आहे.
न्यायालयाने स्पष्ट केले आहे की जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहणार नाही आणि मुस्लिमांच्या हक्कांवर ५ वर्षे इस्लामचे अनुयायी असण्यासारख्या मनमानी अटी तात्काळ स्थगित करण्यात आल्या आहेत.
हा निर्णय अल्पसंख्याकांचे हक्क चिरडून टाकू इच्छिणाऱ्या शक्तींना योग्य उत्तर आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की संविधान सर्वोच्च आहे आणि न्यायव्यवस्था त्याच्या संरक्षणासाठी सर्वात मजबूत ढाल आहे.
वक्फ बचाओ समिती आणि एकता संघटनेचे समन्वयक फारुख शेख यांनी या निर्णयाचे वर्णन अल्पसंख्याक समुदायाच्या सन्मानाचा, हक्कांचा आणि अस्तित्वाचा विजय असल्याचे म्हटले आहे.
त्याच वेळी, त्यांनी इशारा दिला की समाज कधीही कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणारा आणि मनमानी कायदा स्वीकारणार नाही.
मुफ्ती रमीज यांनी निकालाच्या मथळ्यांबद्दल सांगितले, मुफ्ती खालिद यांनी पुढील रणनीती सांगितली आणि आपल्याला काय करायचे आहे यावर प्रकाश टाकला.मतीन पटेल यांनी त्या लोकां प्रति नाराजी व्यक्त केली ज्यांनी स्वतः वक्फ च्या जमिनी हडप केल्या आहे व वक्फ कार्यालयाचे अधिकारी जे भ्रष्ट आहे.
सर्व सदस्यांनी अल्लाहचे आभार मानले आणि मिठाई वाटली आणि हिंदी मधे खलील घोषणा दिल्या.
न्याय की जीत – मनमानी पर हार!
सुप्रीम कोर्ट ज़िंदाबाद – संविधान ज़िंदाबाद!
हमारा हक़ – हमें मिलेगा!
वक्फ़ संपत्ति पर न अन्याय, न अत्याचार!
अल्पसंख्यकों का सम्मान – लोकतंत्र की पहचान!
एकता में है शक्ति – अन्याय के ख़िलाफ़ एकजुट
जल्लोषात यांची होती उपस्थिती
मुफ्ती खालिद, मुफ्ती रमीज, मौलाना रहीम पटेल, मौलाना वसीम पटेल, फारूक शेख, नदीम मलिक, अनीस शाह, युसूफ पठाण, कासिम उमर, सलीम इमांदर, मतीन पटेल, रज्जाक पटेल, मौलाना गुफ्रान, सय्यद इरफान अली, इत्यादी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
मिठाई वाटप करताना वक्फ बचाव समिती आणि एकता संघटनेचे कार्यकर्ते