Breaking
ब्रेकिंग

भडगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक मिर्झा नाजीम बेग यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार…!

भडगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक मिर्झा नाजीम बेग यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार...!

1 1 4 4 0 4

SATYAKAM NEWS – इमरान शेख डिजिटल मीडिया नेटवर्क भडगाव

भडगाव: शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची दखल घेत अँग्लो उर्दू हायस्कूल, भडगावचे मुख्याध्यापक मिर्झा नाजीम बेग हकीम बेग यांना प्रतिष्ठेचा ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.

एस्पायर फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रविवार, १८ ऑक्टोबर २०२६रोजी समृद्धी बँक्वेट हॉल, नांदूर नाका, नाशिक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

या अभिमानास्पद यशानंतर आज सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६रोजी अँग्लो उर्दू हायस्कूलच्या संचालक मंडळातर्फे शाळेत विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शाळेचे अध्यक्ष आसिम मिर्झा साहेब, सचिव शेर खान साहेब, संचालक मंडळ सदस्य सरवर बेग, शब्बीर खान, सलीम शेख अकबर, बग्गू पठाण, इशाक मलिक, सामाजिक कार्यकर्ते वकार शेख, सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

विशेष म्हणजे याच कार्यक्रमात संचालक व ज्येष्ठ पत्रकार हय्युम अली सय्यद यांचाही सन्मान करण्यात आला.

भडगावच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असून मिर्झा नाजीम बेग सरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 4 4 0 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे