एरंडोल तालुक्याती अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट सरकारने मदत करावी. अशी मागणी शेतकरी कामगार पक्ष चे वतीने करण्यात आली
एरंडोल तालुक्याती अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट सरकारने मदत करावी. अशी मागणी शेतकरी कामगार पक्ष चे वतीने करण्यात आली

प्रतिनिधी : जैनुल शेख
आज दिनांक,२१ सप्टेंबर रोजी, एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे शेतकरी आसमानी संकटात सापडला
अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी,५० हजार रुपये मदत करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जैनुल शेख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
२२सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तालुक्यातील जवळपास सर्वात भागात पीक वाया गेलेला आहे या हंगामा वाया गेला आहे यामुळे शेतकरी,, हवलदिल झालेला आहे तसेच हात मजुरांच्या रोजगार देखील हातातून गेलेला आहे याच्यावर उपासमारी ही वेळ आलेली आहे हात मजुरांना देखील शासनाने मदत करावी सरकारने या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सरसकट हेक्टर ५० हजार रुपये तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्ष पक्षाचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जैनुल शेख यांनी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे तसेच नमूद केलेले आहे की पंचनामे न करता सरकारने सरसकट मदत करावी या पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्व काही हिरावून गेले आहे एक तर पीक वाया आहेतच लाखो हेक्टर जमीन उघडून गेली आहे अशा वेळी सरकारने भरघोस मदत करावी अशी शेतकरी कामगार पक्ष च्या वतीने एरंडोल तहसीलदार साहेब ला निवेदनाद्वारे केली आहे.
यांना विनंती आहे की शेतकरी आणि मजूर आणि घरात घुसलेले,, पाणी यां, लोकांचे पंचनामे न करता सगळ्यांना मदत करावी अशी मागणी गावात होत आहे चर्चेत आहे
मा. जिल्हाधिकारी साहेब*
*जळगाव*
जिल्हा जळगाव
यांचे सेवेशी.
*व्दारे*
*मा.तहसिलदार साहेब*
*एरंडोल*
तालुका एरंडोल जिल्हा जळगाव
यांचे सेवेशी.
*विषय*—– *,,उत्राण,एरंडोल तालुक्यातील ” *शेतकरी अस्मानी संकटांत*, दि.२१/९/२०२५ रोजी रात्री व दि. २२/९/२०२५ रोजी अतिवृष्टी ने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी….
सन्माननीय महोदय,
वरील विषयास अनुसरून शेतकरी कामगार पक्ष पक्षाच्या वतीने निवेदन सादर करण्यात येते की,
दि.२१/९/२०२५ रोजी रात्री, व २२/९/२०२५ रोजी झालेल्या पावसामुळे शेतकरी बांधव प्रचंड हवालदिल झाला आहे. तालुक्यात जवळपास सर्वच भागांतील पिकं वाया गेली आहेत. या हंगामच वाया गेला आहे, यामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे.
तसेच हात मजुरांचा रोजगार देखील हातातून गेलेला आहे. यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे . या हात मजुरांना देखील शासनाने मदत करावी.
सरकारने या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत घ्यावी.
अशी मागणी शेतकरी कामगार पक्ष,
पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच निवेदनात असे नमूद केले आहे की पंचनामे न करता सरसकट सरकारने मदत करावी.
या पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्व काही हिरावून गेले आहे. एक तर पिक वाया गेली आहेतच, लाखो हेक्टर जमिनी खरवडून गेली आहे.
अशावेळी मायबाप सरकारने भरघोस मदत करावी. असे निवेदनात नमूद केले आहे. अशी मागणी शेतकरी कामगार पक्ष अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष भाई जैनुल शेख याच्या वतीने एरंडोल यांनी निवेदनाद्वारे केली आहे.