Breaking
ब्रेकिंग

हजरत सादिक शहा बाबा यांच्या उर्से निमित कासोदा पोलिसांचे नागरिकांना आवाहन…!  

हजरत सादिक शहा बाबा यांच्या उर्से निमित कासोदा पोलिसांचे नागरिकांना आवाहन...!  

1 0 4 0 0 0

सत्यकाम न्यूज उपसंपादक :-इमरान शेख

कासोदा, शहरातील दि. १ जुलैई २०२६-पासून हजरत सादिक शहा बाबा यांच्या उर्से सालाबादप्रमाणे यावर्षीही कासोदा येथे भव्य ऊर्स चे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कासोदा पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.

कासोदा पोलिसांचे आवाहन

कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील सर व त्यांची पोलीस टीम व होमगार्ड तर्फे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील सर

यांनी सांगितले की, “सालाबादप्रमाणे यावर्षीही हजरत सादिक शहा बाबा यांचा उर्सशांततेत व भक्तीमय वातावरणात पार पडावा यासाठी पोलीस दलाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर येणाऱ्या खोट्या मेसेजना बळी पडू नका.”

कासोदा पोलिसांचे चोख बंदोबस्त

मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. संवेदनशील भागात विशेष लक्ष ठेवले जाणार असून, ड्रोन व सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.

कासोदा पोलिसांचे नागरिकांना विनंती

१) ऊर्सदरम्यान शांतता व सलोखा राखावा.

२ )कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

३ )अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई  केली जाईल.

४) कासोदा वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.

मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या वर कासोदा पोलीस प्रशासनाकडून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील सर यांच्याकडून देण्यात आला आहे.

“हा ऊस श्रद्धेचा व एकतेचा प्रतीक आहे. सर्व धर्मीय बांधवांनी सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वी करावा,” असे आवाहन कासोदा पोलिसांनी केले आहे.

पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक: 100 / 112

4/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 4 0 0 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे