कर्मा फाउंडेशनतर्फे १११ गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटपाचा कार्यक्रम संपन्न…!
कर्मा फाउंडेशनतर्फे १११ गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटपाचा कार्यक्रम संपन्न...!

शिंदी प्रतिनिधी :- लखन गरुड
१११ गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या कर्मा फाउंडेशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त अनाथ तसेच अनुसूचित जाती-जमातीतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिंदी येथे पार पडला. यावेळी एकूण १११ अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या सामाजिक उपक्रमासाठी कर्मा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज कैलास गरुड,उपाध्यक्ष हमीद शेख हबीब शेख,खजिनदार रोहित शिवदास गरुड सचिव प्रथमेश गणेश निकम यांचे मोलाचे योगदान लाभले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उपस्थित ग्रामस्थ व पालकांनी कर्मा फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले..



