आमदार मंगेश दादा चव्हाण यांची पूरग्रस्त गावांची पाहणी खेडी, खेडगाव, पोहोरे, करमळू येथील नुकसानाची केली पाहणी…!
आमदार मंगेश दादा चव्हाण यांची पूरग्रस्त गावांची पाहणी खेडी, खेडगाव, पोहोरे, करमळू येथील नुकसानाची केली पाहणी...!

जिल्हा प्रतिनिधी:-कलीम सैय्यद
चाळीसगाव: खेडगाव नदीला आलेल्या पुरामुळे चाळीसगाव तालुका मधील अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी आमदार मंगेश दादा चव्हाण* यांनी काल दिनांक 31 जुलै शुक्रवार रोजी पूरग्रस्त खेडी, खेडगाव, पोहोरे करमळू यापूरग्रस्त गावांची पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत भावी जिल्हा परिषद सदस्य महेश शालिकराव साळुंखे हे उपस्थित होते. त्यांनी पाहणी दरम्यान आमदारांना मोलाचे सहकार्य केले.
पाहणी दरम्यान आमदारांनी घरात शिरलेल्या पाण्यामुळे झालेले नुकसान, पिकांचे नुकसान आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य, धान्य आणि जनावरे वाहून गेल्याची माहिती त्यांना देण्यात आली.
यावेळी आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे निर्देश दिले. तसेच पूरग्रस्तांना तात्काळ अन्न, पाणी आणि औषधोपचाराची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.
पाहणीवेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



