महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून मुस्लिम मंच, भडगावचा सत्कार; सामाजिक सलोख्याचा आदर्श…!
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून मुस्लिम मंच, भडगावचा सत्कार; सामाजिक सलोख्याचा आदर्श...!

इमरान शेख उपसंपादक
भडगाव | प्रतिनिधी:-हय्युम अली सय्यद
सामाजिक सलोखा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सुंदर संगम भडगाव येथे पाहायला मिळाला.
आज मंगळवार, दि. १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह (वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभाग) आदरणीय दिगंबर कट्यारे सर यांनी मुस्लिम मंच, भडगावच्या मान्यवरांचा व कार्यकर्त्यांचा गुलाबपुष्प देऊन विशेष सत्कार केला.
काही दिवसांपूर्वी जामा मशीद, भडगाव येथे हिंदू बांधवांसाठी ‘मशीद परिचय’ हा सामाजिक सलोखा वाढवणारा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचा व्हिडिओ महा. अंनिसच्या अधिकृत ग्रुपवर प्रसारित झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून या उपक्रमाचे प्रचंड कौतुक झाले.
या कौतुकास्पद कार्याची दखल घेत, कट्यारे सरांनी नगरसेवक इम्रान सैय्यद यांच्या संपर्क कार्यालयात भेट देऊन मुस्लिम मंचचे आभार मानले.
याप्रसंगी नगरसेवक तथा आरोग्य सभापती इम्रान अली सैय्यद आणि हाजी जाकीर कुरेशी म्हणाले की, _”आजच्या काळात समाजात अशा सलोखा निर्माण करणाऱ्या आणि जोडणाऱ्या कार्याची अत्यंत गरज आहे.”
या वेळी मुस्लिम मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…



