Breaking
ब्रेकिंग

एरंडोल तालुक्याती कासोदा आडगाव परिसरात ढगफुटीसदृश मुसळधार  पावसाचा कहर..!

एरंडोल तालुक्याती कासोदा आडगाव परिसरात ढगफुटीसदृश मुसळधार  पावसाचा कहर..!

0 9 1 2 9 8

एरंडोल तालुक्याती कासोदा परिसरात दि. २२सप्टेंबर रोजी सकाळपासून दुपारपर्यंत कासोदा, आडगाव, फरकांडे, मालखेडे, उंमरे, तळई, गिरड, उत्राण व परिसरात ढगफुटी सदृश्य, मुसळधार पाऊस कोसळला. सर्वत्र पाणीच पाणी झाले. नदी, नाले तुडुंब भरून वाहत होते. नाल्यांचे पाणी शेतामध्ये घुसले. शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. हाता तोंडाशी आलेला खरिपाचा घास वरुण राजाने हिरावून घेतला. सर्व रस्त्यावर पाणीच पाणी होते अनेक घरांमध्ये पाणी घुसले आज घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी उत्साहात असलेला शेतकरी रडकुंडीस आला.

मधल्या काळात थोडाफार जास्तीचा पाऊस पडत होता. पण त्यातूनही पिके तग धरून

उभे होते. खरिपाचा काहीतरी हंगाम येईल या अपेक्षेत शेतकरी होता. पण सोमवारच्या पावसाने शेतकऱ्यांना हतबल केले प्रत्येक शेतात गुडघ्यापर्यंत पाणी होते. सर्व रस्ते जलमय झाले नदी, नाले तुडुंब भरून वाहत असताना त्यांचे च पाणी शेतांमध्ये घुसले. गावांमधील कन प्रत्येक रस्त्यावर पाणीच पाणी होते ध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले.

वेचणीला आलेल्या कपाशी पिकांमध्ये पाणी साचले

कापसाची बोंडे पाण्याने कुजू लागले अनेक शेतांमध्ये आधीच लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होता, त्यात या पावसाने भर घातली. झालेला खर्चही निघणार नाही अशी अवस्था झाली. परिपकपतेकडे जाणारे सोयाबीन पाण्यात सडले. तूर, मक्का, ज्वारी , बाजरी, कडधान्य, हातचे गेले. केळीसारखे पीक आडवे झाले. भाजीपाला जागेवरच संपला. या परिसरात वांगे, भेंडी सारख्या भाजीपाल्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते, त्यांची वाट लागली. अनेक

वर्षापासून नदी नाल्यांना इतके पाणी आले नव्हते ते एका पावसाने आले शेतांचे बांध फुटले सर्वत्र

पाणीच पाणी दिसत होते, रस्ते जलमय झाल्यामुळे शेत शिवारात जाणे अवघड झाले होते.

सरसकट पंचनामे करून भरपाईची मागणी

ढगफुटी सदृश्य

झालेल्या या मुसळधार पावसाने खरिपाच्या उभ्या कपाशी, मका, तूर, ज्वारी, बाजरी, भाजीपाला, फळबागा इ. यांचे मोठे नुकसान झाले. त्यांचे सरसकट पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातील पंचनामा करण्यासाठी वेळ न घालवता सरसकट पंचनामे करून, तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत व लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. सगळ्यांना मदत करावी अशी मागणी गावात होत आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 2 9 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे