विद्यार्थिनीवरील अमानुष अत्याचाराचा एकता संघटने तर्फे तीव्र निषेध!”
विद्यार्थिनीवरील अमानुष अत्याचाराचा एकता संघटने तर्फे तीव्र निषेध!”

पाचोरा तालुक्यातील अत्यंत धक्कादायक व मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आबीद हुसेन शेख या शालेय बस चालकाने दहावीच्या विद्यार्थिनीवर केलेल्या बलात्कारामुळे संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे. अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना गंभीर असून, यामागील दोषींना कठोर शिक्षा मिळावी अशी जनतेची अपेक्षा आहे.
जळगाव जिल्हा एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख, अध्यक्ष मुफ्ती खालिद, संघटक नदीम मलिक,हाफिज रहीम पटेल, मौलाना गुफरान , अनिस शाह, अन्वर शिकलगार, मतीन पटेल, मजहर पठाण, रज्जाक पटेल, नाजमोद्दीन शेख, कासिम उमर, इम्रान शेख, कय्युम बागवान आदींनी संयुक्तरित्या पत्रकाद्वारे या अमानुष कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
फारुक शेख यांनी शासना कडे मागणी केली आहे की, आरोपीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करून त्याला उर्वरित आयुष्यभर धडा शिकवावा,तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासन व पोलिस प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शाळा व बस वाहतुकीत विशेष सुरक्षा यंत्रणा उभाराव्यात, तसेच अशा प्रकारच्या विकृत प्रवृत्तीला रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणे आवश्यक असून, पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाला तातडीने न्याय व मदत मिळावी यासाठी एकता संघटना कटिबद्ध असल्याचे शेख यांनी म्हटले आहे.