Breaking
ब्रेकिंग

कामतवाडीच्या विकासाला नवी दिशा; विविध विकासकामांचे आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते थाटात भूमीपूजन…!

कामतवाडीच्या विकासाला नवी दिशा; विविध विकासकामांचे आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते थाटात भूमीपूजन...!

1 1 0 5 7 5

इमरान शेख उपसंपादक

गावच्या विकासासाठी शब्द नाही, तर प्रत्यक्ष कामाला प्राधान्य!

पारोळा तालुक्यातील कामतवाडी येथे विविध विकासकामांच्या भूमीपूजन सोहळ्यास उपस्थित राहून आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते विविध विकासकामांचे विधिवत भूमीपूजन करण्यात आले. या निमित्ताने ग्रामस्थांशी संवाद साधत गावाच्या विकासासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, शेतकी संघाचे मा.अध्यक्ष विजूआबा पाटील, तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, शेतकी संघाचे संचालक भैय्यासाहेब पाटील, साहेबरावदादा पाटील, सुरेश पाटील, उपतालुकाप्रमुख गोविंद पवार, खोलसर पोलीस पाटील भारत हटकर, खोलसर येथील बुधा हटकर, मुंदाणे येथील एकनाथ पाटील यांचेसह कामतवाडी-खोलसर व पंचक्रोशीतील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, शिवसेना-युवासेनेचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील म्हणाले की, एरंडोल विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असून, गावागावातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. नागरिकांच्या मागण्या आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन विकासकामांना गती देण्यात येत असून, कामतवाडीच्या विकासासाठीही आवश्यक ती सर्व कामे प्राधान्याने मार्गी लावली जातील.

“विकास हा केवळ आश्वासनांमध्ये नाही, तर तो प्रत्यक्ष कामांमधून दिसला पाहिजे. मंजूर झालेल्या विकासकामांचा दर्जा उत्तम राखून ती वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा राहील.” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

भूमीपूजनाच्या माध्यमातून कामतवाडीच्या विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, गावातील विविध प्रश्न आणि विकासाच्या गरजा टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यासमयी ग्रामस्थांनी केलेल्या उत्स्फूर्त स्वागताबद्दल व दिलेल्या प्रेमाबद्दल आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ जावळे सर यांनी केले.

भूमीपूजन विकासकामांचे… संकल्प सर्वांगीण विकासाचा!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 0 5 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे