चक्क 41 हजाराची बोली बोलून पै.सोनू चौधरी यांनी घेतला पोळ्याचा मान.

कुऱ्हाड प्रतिनिधी.
कुऱ्हाड गावात बैलपोळा सणाला चक्क बोली लावून मान घेतला जातो. मानाच्या बोलीचा रक्कम चक्क 41 हजार बोली बोलून बैलांचे प्रसिद्ध व्यापारी पै.सोनू शांताराम चौधरी या वर्षीचा बैलपोळ्याचा मान घेतला.
कुऱ्हाड येथील बैलपोळा सण मोठा चर्चेत राहून, मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जिल्ह्यातील अनेक गावात वेगवेगळ्या पद्धतीने बैलपोळा सण साजरा केला जातो. परंतु कुऱ्हाड येथे चक्क पैशाची बोली लावून पोळा फोडला जातो. गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मानाच्या बोली मध्ये चांगलीच चुरस बघायला मिळाली. मानाच्या बोलीचा रक्कम चक्क 41 हजार रुपये ची मोठी बोली बोलून बैलांचे प्रसिद्ध व्यापारी कै.पै.सुनील शांताराम चौधरी व कै.पै अनिल शांताराम चौधरी यांचे लहान बंधू पै.सोनू शांताराम चौधरी यांनी या वर्षाचा बैलपोळ्याचा मान घेतला.
सदर बैल पोळ्याचा मान घेण्यासाठी बोलली जाणाऱ्या बोली ची रक्कम ही कोजिगिरी पौर्णिमेला होणाऱ्या कुस्त्यांची दंगलसाठी खर्च केली जाते. पोळ्याचा मान घेणाऱ्या व्यक्तीचा ग्रामपंचायत च्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येतो. या अगोदर सुद्धा सतत सहा वर्ष झाले चौधरी कुटुंब बैल पोळ्याचा मान घेत आहेत.