
उपसंपादक – कल्पेश महाले
जळगांव – राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, त्यानुसार जळगांव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांची बदली छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज दिनांक १८ मार्च रोजी राज्य शासनाने आदेश काढून विविध आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत.
मिनल करणवाल ह्या २०१९ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, सहाय्यक जिल्हाधिकारी, प्रकल्प अधिकारी नंदुरबार तर प्रशिक्षणाचा कार्यकाळ भंडारा जिल्हा येथे पूर्ण केला आहे. मिनल करणवाल या उत्तराखंड राज्यातील देहरादून जिल्ह्यातील रहिवासी आहेत.